Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत जेजुरीत होणार शक्तिप्रदर्शन

Ajit Pawar : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

Team Agrowon

Pune News : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात येत असून, या निमित्ताने त्यांचे कट्टर विरोधक आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे यांच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम होत असल्याने अजित पवार आणि शिवतरे अनेक दिवसांनी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर नेते अजित पवार यांच्यासह ९ बंडखोर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येत आहेत.

त्या निमित्ताने ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमापणत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमाद्वारे अजित पवार यांचे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्यांच्या बैठकांनी दोन दिवसांपासून जोर धरला आहे. शक्तिप्रदर्शनासाठी १३ तालुक्यांतील सर्व सुमारे १ हजार ३०० सरपंचांना आमंत्रित करण्याचे नियोजन आहे.

तसेच प्रत्येक तहसीलदाराने ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत विविध दाखले दिलेल्या लाभार्थ्यांना पण नेण्या-आणण्याची सोय करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. याबाबत एका गटविकास अधिकाऱ्याने माहिती दिली. ते म्हणाले, की जेजुरी येथील कार्यक्रमाबाबत दूरदृश्‍यप्रणालीद्वारे बैठक सुरू आहे. बैठकीत नियोजन सुरू असून, सोमवार (ता. १०) सायंकाळपर्यंत प्रत्येकाच्या जबाबदारीचे वाटप होणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेनेची मोठी अडचण झाली आहे. यामध्ये आता जेजुरीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात अजित पवार आणि विजय शिवतरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT