Agriculture Electricity Connection agrowon
ताज्या बातम्या

Bhor Electricity Supply : भोरमध्ये वीजेचा लपंडाव सुरुच

Bhor Mahavitaran Issue : ग्रामीण भागाबरोबर भोर शहरातही कित्येक तास वीजपुरवठा बंद असतो.

Team Agrowon

Bhor News : शहर आणि तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे विविध कारणांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे वीजग्राहक हैराण झाले असून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. वीज महावितरण कंपनीशिवाय वीजनिर्मिती (जनरेशन) आणि पारेषण या कंपन्यांच्या अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे.

पावसाळ्यापूर्वीची नियमीत कामे करूनही विजेची वाहिनी तुटणे, पक्षी चिकटणे, पीन-इन्सुलेटर नादुरुस्त होणे, रोहित्र बिघडणे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे खांब कोसळणे आदी कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्रामीण भागाबरोबर भोर शहरातही कित्येक तास वीजपुरवठा बंद असतो.

तालुक्यात महावितरणच्या सात सबस्टेशनमधून ३६ हजार १९६ ग्राहकांनी वीजपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक २८ हजार २५० संख्या ही निवासी ग्राहकांची आहे. तालुक्यात महावितरणचे कायमस्वरूपी २७ आणि तात्पुरत्या स्वरूपाचे ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. दर महिन्याला वीजबीलाची सुमारे २ कोटीपर्यंत रक्कम जमा होते आणि सव्वाकोटींपर्यंत थकबाकी राहिली जाते.

जुलै महिन्याअखेर तालुक्यातील ३ हजार ५९७ शेतीपंप ग्राहकांची १३ कोटी ३७ लाखांची थकबाकी येणे असून ३१२ पाणीपुरवठा योजनांची थकबाकी पावणेतीन कोटी रुपयांची आहे. वीजपुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे बिलाची थकबाकी वाढत आहे. तालुक्यातील विजेच्या वाहिन्या आणि विद्युत उपकरणे जुनी असल्यामुळे त्या वारंवार नादुरुस्त होत आहेत.

महावितरणच्या बिघाडाशिवाय भाटघर धरणावरील वीजनिर्मिती आणि पारेषण कंपनीच्या वीजपुरवठ्यामुळेही तालुक्याचा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे कर्मचारी तरीपण महावितरणचे कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहून वीजपुरवठा कायमस्वरुपी सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत यांनी सांगितले.

भोर तालुक्यातील ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल अॅप वापरून सुरक्षित असलेल्या डिजिटल पध्दतीने वीजबिलाचा भरणा करावा आणि आपल्या तक्रारींही तेथे नोंद करावी. तसेच ग्राहकांनी गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याच्या बिलामध्ये १० रुपयांची सूटही मिळते. याशिवाय नवीन वीजजोडणी ही केवळ २४ तासात देण्यात येणार आहे. ग्राहकांनी विजेची बचत करून महावितरणला सहकार्य करावे.
- सचिन राऊत, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण भोर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT