Electricity  Agrowon
ताज्या बातम्या

Electricity : कृषिपंपांची वीज तोडणी मोहीम थांबविली

महावितरण’च्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या सूचना

Team Agrowon

परभणी ः कृषिपंपाचा वीजपुरवठा (Elctricity) तोडण्याची मोहीम थांबविण्याचे आदेश अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडू नये, असा स्पष्ट आदेश ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यानुसार ‘महावितरण’च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी (ता.१०) केली.

‘महावितरण’कडून थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. थकीत वीज देयकांमुळे वीजपुरवठा खंडित केला जातो. देयके भरल्यानंतर पुन्हा जोडला जातो. परंतु फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, ‘महावितरण’च्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडणे थांबवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Development: मुख्यमंत्री बळीराजा योजनेत १५२ शेतरस्त्यांचे प्रस्ताव

Calf Care in Summer: उन्हाळ्यात वासरांची घ्या खास काळजी; उष्माघातापासून करा बचाव

Illegal Cotton Seeds: अवैध कापूस बियाणे विक्रीवर कारवाई

Rural Water Crisis: गादेगावच्या नागरिकांचा घागर मोर्चा

Sawantwadi Rain Damage: सावंतवाडीला वादळाचा तडाखा

SCROLL FOR NEXT