Crop Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : रब्बीत यंदा ३ लाख हेक्टरवर लागवड

बुलडाणा ः जिल्ह्यात चांगला पाऊस, प्रकल्पांमध्ये साठा असल्याने रब्बी हंगामासाठी पोषक परिस्थिती आहे. यामुळे जिल्हयात रब्बीत विविध पिकांची लागवड सुमारे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा ः जिल्ह्यात चांगला पाऊस (Rainfall), प्रकल्पांमध्ये साठा असल्याने रब्बी हंगामासाठी (Rabi Season) पोषक परिस्थिती आहे. यामुळे जिल्हयात रब्बीत विविध पिकांची लागवड (Rabi Crop sowing) सुमारे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक दोन लाख १८ हजार हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे.

जिल्ह्याचे रब्बी क्षेत्र सरासरी २ लाख २७ हजार हेक्टर एवढे आहे. मात्र, गेल्या काही वर्षात परतीचा पाऊस फायदेशीर ठरत असल्याने रब्बीकडे ओढा वाढलेला आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात जिल्ह्यात तीन लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा हीच लागवड तीन लाख ६ हजार पर्यंत पोचू शकते. प्रामुख्याने जिल्हयात रब्बीत हरभरा हेच प्रमुख पीक आहे. यानंतर गहू, रब्बी ज्वारी, मका लागवड होत असते.

मक्याकडेही कल

यंदाच्या रब्बीत जिल्हयात मक्याची लागवड सुमारे २० हजार ७८० हेक्टर एवढी अपेक्षित धरली जात आहे. गेल्या वर्षात १३८७३ हेक्टरवर पेरणी झाली होती. मागील काही हंगामात लष्करी अळीमुळे मका उत्पादक अडचणीत आला होता. मात्र, आता यातून परिस्थिती सावरत असल्याने शेतकरी पुन्हा मक्याच्या लागवडीकडे झुकू लागले.

पीक प्रात्यक्षिके मिळणार

रब्बीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबवले जाईल. यातून कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, गळीत धान्याच्या उत्पादन घेणाऱ्यांसाठी पीक प्रात्यक्षिके राबवले जातील. शिवाय प्रमाणित बियाणे वितरणही कृषी विभागाकडून केले जाणार आहे.

सिंचनासाठी प्रकल्पातील पाण्याचा लाभ मिळणार

रब्बीत सिंचनासाठी लागणारे पाणी प्रकल्पातूनही मिळू शकणार आहे. जिल्ह्यातील सर्वच मोठे प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. गेल्या काही दिवसात प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही करण्यात आलेला आहे. पावसानेही सरासरी गाठल्याने पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. याचा फायदा होणार आहे.

पीक सरासरी क्षेत्र अपेक्षित लागवड क्षेत्र

हरभरा १४६४३८ २१८३००

गहू ५५३९६ ५४८१५

मका ११७८१ २०७८०

ज्वारी १२७६१ १०७३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT