Sugarcane cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात आडसाली उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता

Sangli Sugarcane Plantation : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला तरी ऊस लागवडीसाठी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आडसाली ऊस लागवड खोळंबली आहे.

Team Agrowon

Sangli News : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला तरी ऊस लागवडीसाठी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आडसाली ऊस लागवड खोळंबली आहे. आतापर्यंत आडसाली हंगामातील २ हजार ६६६ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. रोपांची मागणीही कमी झाली आहे. परिणामी आडसाली हंगामातील उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत उसाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. वाळवा, मिरज, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांत सर्वाधिक आडसाली उसाचे क्षेत्र असते. जिल्ह्यात गतवर्षी म्हणजे आता गाळपाला जाणाऱ्या आडसाली हंगामातील उसाचे ४५ हजार २६१ हेक्टर क्षेत्र आहे.

आडसाली ऊस लागवडीचा कालावधी जुलै-ऑगस्ट आहे. जिल्ह्यातील शेतकरी आडसाली ऊस लागवड करण्यासाठी पुढे येतात. वाळवा, पलूस तालुक्यात एकरी शंभर टनांपेक्षा अधिक उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. पाण्याची उपलब्धता असल्याने वारणा-कृष्णा नदीकाठच्या भागात मेच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्यात ऊस लागवडीसाठी शेतकरी पुढे येतात.

दरवर्षी वळीव पावसानंतर लागवडीपूर्व मशागती पूर्ण केल्या जातात. त्यानुसार शेतकरी लागवडीसाठी नियोजन करतो. मात्र, यंदा वळीव पाऊस झाला नाही. त्यामुळे लागवडपूर्व मशागती थांबल्या होत्या.

परंतु पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी लागवडीसाठी शेताची तयारी केली. ऊस रोपे, बियाण्यांची तरतूद केली. मात्र, पाण्याची कमतरता या साऱ्यामुळे मे-जून मध्ये होणारी ऊस लागवड रखडली आहे. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागती करून सऱ्या सोडल्या आहेत.

सध्या ऊस लागवडीचा हंगाम आहे. दीड महिना झाला तरी, पाऊस नाही, पाणीटंचाई यामुळे लागवडी लांबल्या असल्याचे चित्र आहे. मुळात, कृष्णा आणि वारणा नदीतील पाण्‍याची पातळी कमी आहे. विहिरी, कूपनलिकांमधील पाणीपातळी घटली आहे. मात्र, त्यामुळे नवीन लागवड करण्यापेक्षा उभा असलेला ऊस जगवण्यासाठी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा आडसाली ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तालुकानिहाय आडसाली

ऊस लागवड क्षेत्र

तालुका क्षेत्र

वाळवा १८८१

तासगाव ४४२

पलूस ३४३

एकूण २६६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT