Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : ईशान्य मॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता

महाराष्ट्राचे पूर्व भागातील बहुतांशी जिल्ह्यात काही काळ जोरदार पावसाची शक्‍यता राहील. सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

आज (ता. ३)पासून मंगळवार-बुधवार (ता. ४ ते ६)पर्यंत महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब (Air Pressure) राहील. तर बुधवार (ता.७)पासून शनिवार (ता.१०)पर्यंत १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्‍य आहे. गुरुवार (ता.८) व त्यापुढील काळात बंगालच्या उपसागराच्या (Bay Of Benbgal) उत्तरेकडील भागावर हवेचा दाब १००० ते १००२ हेप्टापास्कल इतका कमी होण्यामुळे वाऱ्याद्वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणले जाईल. त्यामुळे महाराष्ट्राचे पूर्व भागातील बहुतांशी जिल्ह्यात काही काळ जोरदार पावसाची शक्‍यता (Rain Forecast) राहील.

सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. ज्या ठिकाणी हवेचे दाब कमी होतील तेथे पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. सर्वच जिल्ह्यांत या आठवडाच्या अखेरीपर्यंत पावसाची शक्‍यता राहील. बहुतांशी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, तर उत्तर कोकण व पूर्व विदर्भात नैॡत्येकडून राहण्याची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. कमाल व किमान तापमानात अल्पशा वाढीची शक्‍यता आहे. तसेच सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेतही वाढ होईल. एकूणच या आठवड्यात बराच काळ सूर्यप्रकाश व थोड्या कालावधीत अधिक पाऊस अशी हवामान स्थिती राहील.

कोकण

सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत आज (ता. ४) १२ ते १३ मि.मी., तर उद्या (ता.५) १० ते १७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत आज २५ ते २७ मि.मी. व उद्या २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पालघर जिल्ह्यात आज ३६ मि.मी. व उद्या २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत वायव्येकडून, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९५ टक्के, तर दुपारची ७२ ते ७५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक व धुळे जिल्ह्यांत आज (ता.४) ४० मि.मी. तर उद्या (ता.५) २० ते २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आज २१ ते २३ मि.मी., तर उद्या २४ ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ती वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६३ टक्के राहील.

मराठवाडा

आज (ता. ४) लातूर, नांदेड, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी., नांदेड व परभणी जिल्ह्यांत १३ ते १४ मि.मी., उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत १५ मि.मी. आणि हिंगोली व जालना जिल्ह्यांत २६ ते ३५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.५) सर्वच जिल्ह्यांत २० ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ८ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ

आज वाशीम जिल्ह्यात २७ मि.मी., अकोला जिल्ह्यात ४५ मि.मी., बुलडाणा जिल्ह्यात ५० मि.मी. व अमरावती जिल्ह्यात ५६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.५) वाशीम जिल्ह्यात २७ मि.मी., अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३१ मि.मी. आणि बुलडाणा जिल्ह्यात ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ७ ते १२ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के व दुपारची ६० टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज (ता.४) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २१ ते ३० मि.मी. तर उद्या (ता.५) १४ ते २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि वेग ताशी ६ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज (ता.४) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १८ मि.मी., तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.५) भंडारा जिल्ह्यात ४० मि.मी. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत १४ ते २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के व दुपारची ६० टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज (ता. ४) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत १० ते २४ मि.मी., तर पुणे व नगर जिल्ह्यांत ३७ ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.५) सर्वच जिल्ह्यांत १० ते २५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ६ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस व किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९७ टक्के व दुपारची ४६ ते ६७ टक्के राहील.

कृषी सल्‍ला

रब्बी हंगामात येणाऱ्या उत्तम, अधिक उत्पादन देणाऱ्या करडई वाणांची पेरणी करावी.

रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी सुधारित जातींची निवड करावी.

ऊस पिकांत तण नियंत्रणासाठी शिफारशीत तणनाशकांची फवारणी करावी.

भुईमूग पिकावरून मोकळा ड्रम फिरवावा. त्यामुळे आऱ्या जमिनीत जातील व शेंगा अधिक लागतील.

भात खाचरात पाण्याची पातळी ५ सेंमी पर्यंत नियंत्रित करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर

मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT