Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे

Lumpy Virus : पश्‍चिम विदर्भात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

Team Agrowon

Akola News : पश्‍चिम विदर्भात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर अकोला जिल्ह्यात तीन संशयास्पद जनावरांचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

गेल्या वर्षात लम्पी स्कीन आजाराने या भागात धुमाकूळ घातला होता. यंदा लसीकरणाला वेग देण्यात आलेला असून, बऱ्यापैकी जनावरांवरील हा रोग आतापर्यंत नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. मात्र आता काही ठिकाणी संशयास्पद जनावरे आढळून येऊ लागली आहेत. अकोला जिल्ह्यात तीन ठिकाणी लम्पीसदृश आजाराची लक्षणे असलेली जनावरे दिसून आली.

या जनावरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आलेले आहेत. याबाबतचा अहवाल आल्यानंतरच लम्पी स्कीनबाबत निश्‍चित होऊ शकेल. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ३३ हजार २७१ जनावरांपैकी १ लाख ९७ हजार ४८४ जनावरांचे लसीकरण झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली. उद्दिष्टाच्या ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

बुलडाण्यात आठवडे बाजार बंद

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बाजार समित्यांमार्फत भरवले जाणारे जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश काढण्यात येत आहेत. मागील वर्षीसुद्धा अनेक दिवस जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले होते.

पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षामुळे बुलडाणा जिल्ह्यात वेगाने हा चर्मरोग जनावरांवर पसरला होता. यंदाही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे पशुपालक बोलत आहेत. पहिल्या टप्प्यात बाजार बंद करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT