Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Forecast : राज्यात हलक्या पावसाची शक्यता

राज्यात आज बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप होती. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र पाऊस सार्वत्रिक नव्हता.

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्यात आज बहुतांश ठिकाणी पावसाची (Rainfall) उघडीप होती. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र पाऊस सार्वत्रिक नव्हता. तर हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केला.

कोकणताली बहुतांश भागांत सोमवारी पावसाची उघडीप कायम होती. पालघर जिल्ह्यातील मोखेडा आणि विक्रमगड मंडळांत पावसाने हजेरी लावली. मात्र इतर मंडळांमध्या पावसाची उघडीप कायम होती. रायगड जिल्ह्यातील बहुतेक मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. पेण येथे सर्वाधिक २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उघडीप होती. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र पाऊस कमीच होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याच मंडळात पावसाची नोंद झाली नाही.

मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली होती. नगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यांत पाऊस नव्हता. उन्हाचा चटका वाढला होता. नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र कुठेच पावसाचा जोर नव्हता.

मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या. मात्र जोरदार पाऊस नव्हता. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर या मंडळांत हलक्या सरी पडल्या. तर बीड जिल्ह्यातील केज येथे ५३ मिलिमीटर पाऊस पडला. तर तीन मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. हिंगोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांध्ये पावसाची नोंद झाली नाही. जालना जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी आणि मंठा येथे हलका पाऊस झाला. तर लातूर जिल्ह्यातील नगर येथे ७७ मिलिमीटर पाऊस पडला. तसंच देवणी आणि लातूर येथे मध्यम पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे ७६ मिलिमीटर तर माहूर येथे ६५ मिलिमीटर पाऊस झाला. तर काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. परभणी जिल्ह्यातही पावसाची विश्रांती कायम होती.

विदर्भातील अकोला, भंडारा, गोंदीया आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली. अमरावती जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आणि पोंबुर्ना येते मध्यम सरी पडल्या. तर इतर भागांत हलक्या सरी झाल्या.गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, मुलचेरा, शिरोंचा आणि अहोरी मंडळांमध्येही पाऊस झाला. गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम जिल्ह्यातही बहुतांशी मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडल्या. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला.

हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. तर सर्वत्र हलक्या सरी पडतील असाही अंदाज व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT