Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : किमान तापमानात चढ-उतार शक्य

किमान तापमानात घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : किमान तापमानात (Minimum Temperature) घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मराठवाड्यात गारठा (Cold Weather) कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम राहून, किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. ३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव येथे ९.८, औरंगाबाद व नाशिक येथे १०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान होता.

उन्हाचा चटका कायम असला, तरी राज्याच्या कमाल तापमानातही हळूहळू घट होत आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवस राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असली तरी, त्यानंतर किमान तापमानात मोठी घट होत थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत आहेत.

चुरू येथे उणे ०.९ अंश तापमान

उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र होत असल्याने मंगळवारी (ता. ३) राजस्थानमधील चुरू येथे पारा शून्य अंशांच्याही खाली घसरल्याने देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे ०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ४) पंजाब, राजस्थान, हरियाना, चंडीगड, दिल्ली या राज्यांत थंडीची तीव्र लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेशातही थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे. वरील राज्यात थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे. उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३२.१ (१२.५), जळगाव २९ (९.८), धुळे २८ (७.८), कोल्हापूर ३०.६ (१९.५), महाबळेश्‍वर २८.७ (१४.१), नाशिक ३०.२ (१०.६), निफाड २७.४ (८.४), सांगली ३१ (१८.१),

सातारा ३१.६ (१४.९), सोलापूर ३३.७ (२०.१), सांताक्रूझ ३२.४ (१६.६), डहाणू २८.३ (१६), रत्नागिरी ३१.७ (१९.१), औरंगाबाद ३० (१०.६), नांदेड ३०.८ (१७.८), उस्मानाबाद - (१५), परभणी ३०.७ (१७), अकोला ३०.८ (१४.९), अमरावती ३१ (१४.३), बुलडाणा २९ (१४.५), ब्रह्मपुरी २९.८ (१५.२), चंद्रपूर २८.२ (१७.४), गडचिरोली २९ (१३), गोंदिया २८ (१२.१), नागपूर २८.४ (१३.२), वर्धा २८.२(१४.५), यवतमाळ २८.५ (१६.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT