Ravikant Tupkar Agrowon
ताज्या बातम्या

Ravikant Tupakr : जलसमाधी आंदोलनाबाबत तुपकरांना पोलिसांची नोटीस

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथे अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : सोयाबीन-कापूस उत्पादक (Soybean Cotton Farmer) शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मुंबई येथे अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी (Jalsamdhi Protest) घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

ही नोटीस नुकतीच पोलिसांनी दिली आहे. मात्र, कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही. सोयाबीन - कापूस उत्पादकांच्या न्याय्य हक्कासाठी मुंबई येथे जलसमाधी आंदोलन करणार, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.

मुंबई येथे अरबी समुद्रात २४ नोव्हेंबरला जलसमाधी आंदोलन तुपकर यांनी जाहीर केले आहे. या आंदोलनामुळे बुलडाणा जिल्ह्यासह मुंबई व इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर स्वरूपाचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण आंदोलन करू नये, अशा स्वरूपाची नोटीस बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी बजावली आहे.

पोलिसांच्या माध्यमातून नोटिसा पाठवून सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी आडवा-आडवी केल्यास सरकारला महागात पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांचा हा लढा आहे.

आता माघार घेणार नाही, असे तुपकर यांनी जाहीर केले. २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता बुलडाणा येथून वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना होईल. २४ ला सकाळी १० वाजता मंत्रालयाशेजारी गिरगाव चौपाटीवरुन समुद्रात जलसमाधी घेतील, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT