Market Committee Agrowon
ताज्या बातम्या

Market Committee : नांदगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे हाल

नांदगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे हाल

Team Agrowon

नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती : येथील बाजार समितीला (Market Committee ) आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेतकऱ्यांकडून (Farmer) उपलब्ध होतो. तरीही नांदगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाची हेळसांड होत आहे. तर व्यापाऱ्यांना मात्र सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

दिवाळीच्या सुटीनंतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली. परंतु लिलाव ओट्यावर व्यापाऱ्यांचा माल पडून असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला जागा अपुरी पडत आहे. मालाचे ढेर एकमेकात मिसळले जात आहेत. याच मालावरून अनेक जण ये-जा करीत असल्याने अक्षरशः शेतकऱ्यांच्या मालाचे मातेरे होत असल्याचे वास्तव आहे.

व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल लिलाव ओट्यावर अनेक दिवस पडून राहतो. कधी कधी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाचे पोते लिलाव ओट्यावर मधोमध पडून राहतात. याचा त्रास शेतकऱ्यांना होत असूनसुद्धा बाजार समितीचे प्रशासन या प्रश्नाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

व्यापाऱ्यांवर मेहेरबानी का?

शनिवारी खरेदी केलेल्या मालाची रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उचल झाली नाही, असे दिसून आले. यावरून बाजार समितीचे प्रशासन शेतकऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देऊन व्यापाऱ्यांवर मेहरबान का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बाजार समितीमध्ये अनेक वर्षांपासून सचिवपद रिक्त असल्याने येथील कारभार रामभरोसे सुरू आहे. कोणताही प्रशासकीय वचक नाही. तेव्हा येथे शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT