Banana Planting Agrowon
ताज्या बातम्या

Banana Cultivation : उशिराची मृग बहर केळी लागवड अद्याप सुरूच

Banana Planting : केळीचे दर यंदा टिकून होते. फक्त या महिन्यात दर कमी अधिक झाले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. पण केळीला चांगला पर्याय कृत्रिम जलसाठाधारकांकडे नाही. यामुळे केळी लागवड कायम आहे.

Team Agrowon

Jalna News : खानदेशात मृग बहरातील उशिराची केळी लागवड सुरूच आहे. अर्ली केळी लागवड रावेरात गेल्या महिन्यातच झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात वाढू शकते, अशी स्थिती आहे.

केळीचे दर यंदा टिकून होते. फक्त या महिन्यात दर कमी अधिक झाले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. पण केळीला चांगला पर्याय कृत्रिम जलसाठाधारकांकडे नाही. यामुळे केळी लागवड कायम आहे. यंदा ती वाढू शकते. यंदा मार्च ते मेच्या मध्यापर्यंत दर्जेदार केळीला चांगला उठाव होता. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले.

जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू झाली. तर कांदेबाग केळीची काढणी दसरा सणापासून सुरू होत असते. सध्या मृग बहर व पिलबाग केळीची काढणी रावेर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, शहादा, तळोदा भागात सुरू आहे.

या केळीला किमान ६०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. मृग बहर केळीची लागवड मे महिन्यात सुरू होते. अर्ली लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते. तर नियमित लागवड जूनपासून सुरू होते. खानदेशात मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते. तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते.

कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते. तर मृग बहराची जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते. काही भागात केळी लागवडीसाठी मजूरटंचाईचा फटका बसत आहे.

४२ ते ४३ हजार हेक्टरवर लागवड शक्य

रोपांच्या किंवा उतिसंवर्धित केळी रोपांच्या लागवडीसाठी चांगले नियोजन करून घ्यावे लागते. यंदा खानदेशात मृग बहरातील केळीची एकूण लागवड ४२ ते ४३ हजार हेक्टरवर होवू शकते. लागवड आणखी २० ते २५ दिवस सुरू राहील, अशी माहिती मिळाली. अनेक शेतकरी आंबेमोहोर, महालक्ष्मी आदी केळी वाणांचा उपयोग केळी लागवडीसाठी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT