Sugarcane Cultication agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultication : सांगली जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवर उसाची लागवड

जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आडसाली ऊस लागवड सुरू झाली आहे. गेल्या पंधरादिवसांपूर्वी पडलेल्या परतीच्या पावसामुळे ऊस लागवडीचा वेद मंदावला होता.

Team Agrowon

सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आडसाली ऊस (sugarcane) लागवड सुरू झाली आहे. गेल्या पंधरादिवसांपूर्वी पडलेल्या परतीच्या पावसामुळे ऊस लागवडीचा वेद मंदावला होता. येत्या आठवड्यापासून ऊस लागवडीस गती येईल. जिल्ह्यात आत्तापर्यंत ४० हजार ५५० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून महापुरामुळे आडसाली ऊस लागवडीचे नियोजन बदलले आहे. वास्तविक दोन वर्षांपासून कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी मे महिन्यापासूनच ऊस लागवड करण्यास प्रारंभ केला. परंतु लागवड झाल्यानंतर महापुराचे पाणी शेतात येते. त्याचा परिणाम ऊस पिकावर होतो.

उसाची वाढ खुंटते. त्यामुळे यंदा महापुराच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यासाठी पुढे आले नाहीत. परंतु, नदीकाठचा भाग वगळता इतर भागात लागवड करण्यास सुरुवात शेतकऱ्यांनी केली.

यंदाच्या हंगामात वाळवा तालुक्यात आडसाली उसाची लागवड जास्त झाली आहे. पूर्व हंगामी, सुरू या हंगामातील ऊस लागवड प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यात केली जाते. त्यादृष्टीने शेतकरी नियोजन करू लागला आहे. शेतातील पूर्व मशागत पूर्ण झाली आहे.

आता दर्जेदार बियाणे आणून ऊस लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात २० हजार ८४५ हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. चार महिन्यांत २० हजार हेक्टरने लागवड वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांत उसाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे यंदाही उसाच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे.

तालुकानिहाय ऊस लागवड क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज ३८०२

जत ३७

खानापूर २८३०

वाळवा २१२९६

तासगाव २७२५

शिराळा ७६०

आटपाडी ३६२

पलूस ३४२०

कडेगाव ५३१५

एकूण ४०५५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT