Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : रब्बीसाठी २ लाख ४४ हजार हेक्टरवर नियोजन

टीम ॲग्रोवन

सांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात (Rabi Season) युरियासह खते (Fertilizer), बियाण्‍यांच्या (Seed) पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने (Agriculture Department) आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ४४ हजार ८०० हेक्‍टर आहे. जिल्ह्यासाठी ज्वारी, सोयाबीनसह विविध प्रकारचे ३९ हजार ८७९ क्विंटल बियाणे तर १ लाख ८० हजार ६१५ टन खतांची मागणी (Fertilizer Demand) केलेली आहे, अशी माहिती, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू होईल. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बियाणे आणि खतांची मागणी शासन स्तरावर नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील आटपाडी आणि जत तालुक्यात रब्बीचे क्षेत्र अधिक असून शाळू ज्वारीची पेरणी केली जाते.

त्यानंतर जत, कवठे महांकाळ, तासगाव व मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. रब्बीमध्ये शाळू ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफुल, भुईमूग, तीळ ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. हंगामात शाळू ज्वारी, हरभरा, मक्‍याचे क्षेत्र सर्वाधिक असते. त्यामुळे हरभरा आणि गहू या पिकांच्या बियाणांची अधिक मागणी केली आहे.

जिल्ह्यात विविध प्रकारची ५७ हजार १२७ टन खते शिल्लक आहेत. रब्बीच्या पार्श्वभूमीवर १ लाख ८० हजार ६१५ टन खतांची मागणी केली आहे. दरवर्षी खतांची टंचाई लक्षात घेऊन यंदाच्या रब्बी हंगामात खतांची अधिक मागणी केली आहे. त्यामुळे यंदा खतांसह बियाण्यांची कमतरता भासणार नाही. तसेच बियाण्यांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी अकरा भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

बियाणे मागणी स्थिती (क्विंटलमध्ये)

बियाणे सार्वजनिक, खासगी महाबीज

ज्वारी ४९३७ १९७५

गहू १००४५ ४०१८

मका ३१५० १२६०

हरभरा १०१३६ ४०५४

करडई १२६ ५०

सूर्यफुल ७५ ३०

कांदा १६ ६

एकूण २८४८५ ११३९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT