Cotton Bollworm  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळीचे संकट टळले

Cotton Pest : गेल्या महिन्यात अनेक भागांत बोंड अळी आढळून आली होती. यानंतर विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : गेल्या महिन्यात अनेक भागांत बोंड अळी आढळून आली होती. यानंतर विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात बोंड अळीचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्याचे दिसून आले असून, बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी झाल्याचे दिसून आले.

जुलै महिन्यातील अतिवृष्टीनंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडला होता. या काळात पिकाची वाढ होत असल्याने पाऊस अत्यंत गरजेचा होता. अशातच जिल्ह्यातील काही भागात कपाशीवर गुलाबी बोंड अळी दिसून आली. कृषी विभाग तसेच कृषी संशोधन केंद्राकडे अनेक भागांतून शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या.

यानंतर विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत रोव्हिंग सर्वेक्षण करण्यात आले. यात बोंड अळीची स्थिती तसेच तिचे प्रमाण यांची माहिती घेण्यात आली. या सर्वेक्षणात शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. बोंड अळी असली तरी तिचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे आढळून आले.

बोंड अळी दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उत्पादनात घट येईल अशी चिंता शेतकऱ्यांना होती. सर्वेक्षणात सध्या तरी दिलासादायक चित्र पुढे आले आहे. बोंड अळीचे अस्तित्व असले तरी तिचे प्रमाण, आर्थिक नुकसान पातळीच्या कमी दिसून आले आहे.

विभागीय कृषी संशोधन केंद्रामार्फत पीकस्थितीच नियमित आढावा घेतला जातो. यासाठी रोव्हिंग सर्वेक्षण केले जाते. गुलाबी बोंड अळीच्या तक्रारीनंतर सर्वेक्षण करण्यात आले. काही भागांत अळी दिसली तरी त्यांचे प्रमाण कमी दिसून आले आहे. अळी जास्त प्रमाणात आढळून आल्यास शेतकऱ्यांनी संपर्क करावा.
- डॉ. प्रमोद यादगिरवार, विभागीय अध्यक्ष, गुलाबी बोंड अळी संनियंत्रण समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT