Pest Control Agrowon
ताज्या बातम्या

Pest Control : बदलत्या काळात पेस्ट कंट्रोल सुरक्षित

बदलत्या काळात पेस्ट कंट्रोल अधिक सुरक्षित व आरोग्यदायी होत आहे. अशावेळी याबाबत जागृती व्हायला हवी.

Team Agrowon

Pune News ‘‘घरातील झुरळ, पाल, डास, ढेकूण, माशी यांसह अन्य कीटकांना हद्दपार करून आरोग्य चांगले राहण्यासाठी पेस्ट कंट्रोल (Pest Control) गरजेचे आहे. बदलत्या काळात पेस्ट कंट्रोल अधिक सुरक्षित व आरोग्यदायी होत आहे.

अशावेळी याबाबत जागृती व्हायला हवी. तसेच पेस्ट कंट्रोल करताना सुरक्षेची आवश्यक काळजी घ्यायला हवी,’’असे मत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील (Vikas PAtil) यांनी व्यक्त केले.

इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनतर्फे (आयपीसीए) आयोजित दोनदिवसीय तांत्रिक प्रशिक्षण वर्गाच्या उद्‍घाटनावेळी विकास पाटील बोलत होते. पीवायसी जिमखाना येथे झालेल्या कार्यक्रमावेळी अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, ‘आयपीसीए’चे उपाध्यक्ष गोपी नायर, वरिष्ठ सदस्य गुरुप्रसाद आगवणे, खजिनदार अभय शहाणे, यूपीएलचे सेल्स हेड कानिफनाथ माचे, ‘इनवु’चे सेल्स हेड उमेश घरत आदी उपस्थित होते. ४० पेक्षा अधिक कामगार या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.

श्री. पाटील म्हणाले, की शहरीकरणाचा वेग वाढला असून, पेस्ट कंट्रोलचा उपयोग गरजेचा बनला आहे. घरात कीटकनाशक वापरताना पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कर्मचारी आणि घरातील व्यक्तींनी नेमकी कशी काळजी घ्यावी याबाबत अशा प्रशिक्षण वर्गातून माहिती मिळेल. कृषी विभागामार्फत कीटकनाशकांच्या वापराबाबत नियमितपणे जागृती केली जाते.

अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे म्हणाले, की पेस्टिसाइडचा योग्य वापर व्हावा, त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणाचा चांगला परिणाम होईल.

कौशल्य विकासाला यातून चालना मिळेल. पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी हे प्रशिक्षण घेतले जाते. वेगवेगळ्या प्रक्रियेची माहिती, गुणवत्ता, पेस्ट कंट्रोलच्या पद्धती यावर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. ‘आयपीसीए’ गोपी नायर यांनी प्रास्ताविकात सांगितले. आभार गुरुप्रसाद आगवणे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT