Farmer Protest Agrowon
ताज्या बातम्या

Farmers Protest : कृषिमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शेतकरी क्रांती संप सुरू होऊन नऊ दिवस झाले. मात्र लोकप्रतिनिधी न फिरकल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २४) वरखेडा (ता. सेनगाव) येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

टीम ॲग्रोवन

हिंगोली : जिल्ह्यातील गोरेगाव (ता. सेनगाव) येथील शेतकरी क्रांती संप (Shetkari Samp) सुरू होऊन नऊ दिवस झाले. मात्र लोकप्रतिनिधी न फिरकल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २४) वरखेडा (ता. सेनगाव) येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, (Abdul Sattar)आमदार तान्हाजी मुटकुळे (Tahnaji Mutkule)यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे शुक्रवार (ता.१६) पासून गोरेगाव तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी संप सुरू केला आहे. सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पीकविमा द्यावा. वीजबिल माफ करावे, आदी मागण्यांसाठी दररोज विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत.

परंतु या आंदोलनाची शासकीय, प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शनिवारी (ता. २४) वरखेडा येथे कृषिमंत्री तसेच आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

हिंगोली : मागण्यांची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ वरखेडा (ता. सेनगाव) येथे शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार तान्हाजी मुटकुळे

यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT