PDKV Akola
PDKV Akola Agrowon
ताज्या बातम्या

PDKV News : ‘पंदेकृवि’चे केंद्र देशात सर्वोत्कृष्ट

Team Agrowon

PDKV News अकोला ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV ) कापणीपश्‍चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्रास राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार (Agriculture Award) जाहीर झाला आहे.

कासारगोड (केरळ) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प कापणीपश्‍चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या ३८ व्या वार्षिक कार्यशाळेत सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून सन्मानित करण्यात आले.

या केंद्रांतर्गत विविध कृषी प्रक्रियेवर आधारित २४ पेक्षा जास्त यंत्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रामार्फत पीकेव्ही मिनी डाळ मिल, पीकेव्ही सफाई प्रतवारी यंत्र, पीकेव्ही स्कू-पालीशर, पीकेव्ही कचरा ज्वलीत शुष्कक, पीकेव्ही बीज निष्कासन यंत्र, पीडीकेव्ही फळ प्रतवारी यंत्र, पीडीकेव्ही कांदा प्रतवारी यंत्र, पीडीकेव्ही हरभरा गाठे काढणी यंत्र, पीडीकेव्ही हळद सफाई यंत्र, पीडीकेव्ही हळद काप यंत्र इत्यादी विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

तसेच कृषी प्रक्रियेवर आधारित कडधान्य मूल्यवर्धन साखळी या केंद्राने स्थापन केली आहे. तसेच या केंद्राद्वारे ३२ यंत्र उत्पादक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत

या विभागांतर्गत निर्मित पीकेव्ही मिनी डाळ मिलचे ७००० पेक्षा जास्त यंत्राची विक्री झाली आहे. या विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनात ३३ कृषी प्रक्रिया केंद्र ग्रामीण भागात उभारण्यात आले.

या कामगिरीमुळे केंद्राला देशपातळीवरील प्रतिष्ठित असा सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

केंद्राच्या उल्लेखनीय कार्यासाठी कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एस. बी. वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

संशोधन अभियंता डॉ. पी. एच. बकाने व त्यांच्या चमूने विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, डॉ. खर्चे, कुलसचिव डॉ. काळबांडे, डॉ. वडतकर यांच्या उपस्थितीत पुढील संशोधनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT