Onion Subsidy Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : कांद्याचे जाहीर केलेले अनुदान तातडीने द्या

Onion Market : राज्य सरकारने कांद्याला अनुदान जाहीर केलेले आहे. मात्र ते दिलेले नाही. मी मंत्री असताना त्या काळातही कांद्याला अनुदान दिले होते.

Team Agrowon

Nashik News : ‘‘राज्य सरकारने कांद्याला अनुदान जाहीर केलेले आहे. मात्र ते दिलेले नाही. मी मंत्री असताना त्या काळातही कांद्याला अनुदान दिले होते. त्या वेळी कामात गती होती. सरकारने अनुदान देण्यासाठी लक्ष दिले पाहिजे.

अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करू. सरकारसोबत असलो म्हणजे असे नाही, की आम्ही काही करणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत,’’ अशी भूमिका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडली.

गुरुवारी (ता. ६) खोत हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पवार, माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, कार्यकारी अध्यक्ष दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे उपस्थित होते.

खोत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री स्वतःच्या शेतावर जातात. काम करतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर यावं. त्यांच्याबरोबरही काम करून बघावं. त्यांचे कष्ट पाहावे, तेव्हाच शेतकऱ्यांच्या शेतातील प्रश्‍न समजतील.’’

‘‘दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली. मात्र ही समिती म्हणजे कोपऱ्याला गूळ लावण्याचा प्रकार आहे. तो गूळ खाताही येत नाही आणि चाटताही येत नाही. मग काय फायदा? मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ती समिती बकवास आहे,’’ अशी टीका त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT