VNMKV Implements Agrowon
ताज्या बातम्या

VNMKV Implements : परभणी विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारे उत्‍तर प्रदेशातही लोकप्रीय

उत्‍तर प्रदेशातील गोरखपुर येथील महायोगी गोरखपुर कृषी विज्ञान केंद्राच्‍या वतीने नुकतेच कृषि महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. कृषि महोत्‍सवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पांतर्गत विविध बैलचलीत अवजारे ठेवण्यात आली होती.

Team Agrowon

उत्‍तर प्रदेशातील (UP) गोरखपुर (Gorakhpur) येथील महायोगी गोरखपुर कृषी विज्ञान केंद्राच्‍या (KVK) वतीने नुकतेच कृषि महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते.

कृषि महोत्‍सवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पांतर्गत विविध बैलचलीत अवजारे ठेवण्यात आली होती.

हे बैलचलित अवजाराचे दालन शेतकऱ्यांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. सदर दालनास उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री श्री. योगी आदित्‍यनाथ यांनी भेट देऊन अवजारांची पाहाणी केली.

यावेळी कृषी अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, डॉ राहुल रामटेके, अजय वाघमारे, जी. बी. आडे, रूपेश काकडे आदींनी मुख्‍यमंत्री यांना विविध अवजारांची माहिती दिली.

यात बैलचलित फवारणी यंत्र, बैलचलित बहुविध पेरणी यंत्र, धसकटे गोळा करण्याचे अवजार, तिहेरी कोळपे, बैलचलित सरी पाडण्याचे यंत्र, ऊसाला माती लावण्याचे अवजार, एक बैलाची अवजारे, बैलचलित सोलर तणनाशक व किटकनाशक फवारणी यंत्र आदींचा समावेश होता.

यावेळी डॉ. स्मिता सोलंकी माहिती देतांना म्‍हणाल्‍या की, सदर यंत्र पर्यावरण पुरक असुन कमी खर्चिक आहे.

कृषी अवजारे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार गोरखापुरे प्रदर्शनात ठेवण्‍यात आली होती.

परभणी कृषी विद्यापीठ विकसित अनेक यंत्र व तंत्रज्ञान हे देशातील इतर राज्‍यातील शेतकरी बांधवाकरिताही उपयुक्‍त असुन विद्यापीठ विकसित यंत्रे जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांपर्यंत पोह‍चविण्‍याकरिता विविध कंपन्‍यासोबत सामंजस्‍य करार करण्‍याची प्रक्रिया चालु आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT