Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy : भात लागवडी उरकल्या

गेल्या आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. यामुळे रखडलेल्या भात लागवडी पूर्ण झाल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे : उशिराने झालेल्या पावसामुळे (Rain) भात लागवडीला (Paddy Cultivation) चांगलाच वेग आला. आता अनेक ठिकाणी भात लागवडी (Paddy Planting) उरकल्या असून पुणे जिल्ह्याच्या भात पट्ट्यात (Paddy Belt) सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ५५ हजार ४७० हेक्टर म्हणजेच ९३ टक्के भाताच्या पुनर्लागवडी (Paddy Re Plantation) झाल्या आहेत. त्यामुळे पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. यामुळे रखडलेल्या भात लागवडी पूर्ण झाल्या आहेत. उशिरा का होईना पाऊस झाल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मजुरांची टंचाई असताना इर्जिक पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या आहेत. तर, काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने भात लागवडी केल्या आहेत.

जूनच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी लगबग सुरू झाली होती. लवकरच चांगला पाऊस होईल म्हणून या आशेने शेतीकामांनी वेग घेतला होता. परंतु काही प्रमाणात भात लागवडी झाल्यानंतर पावसाने दडी मारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. जुलै महिना उजाडला तरी पाऊस न झाल्याने या वर्षी भात लागवड होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना भासू लागली होती. मात्र, दोन ते तीन जुलैपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने भात पट्ट्यातील तालुक्यात जोरदार पाऊस पडला. विशेषतः हा धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने भात खाचरे तुडुंब भरली होती. जोरदार पावसामुळे भात लागवडीतील अडथळा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा भात लागवडी करण्यास वेगाने सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांची चिंता झाली कमी

जिल्ह्यातील सात ते आठ तालुके भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने भात पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामुळे आर्थिक प्रश्न उपस्थित झाला होता. या वर्षी पावसाने रोपवाटिका टाकल्यानंतर दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. परंतु उशिराने का होईना पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. हाच पाऊस अजून लांबणीवर गेला असता तर भात पिकांचे व रोपांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना होती. परंतु उशिराने आलेल्या मुसळधार पावसामुळे भात उत्पादकांची चिंता कमी झाली आहे.

तालुकानिहाय झालेली भात लागवड, हेक्टरमध्ये

तालुका --- सरासरी क्षेत्र -- भात लागवड -- टक्के

हवेली --- २०६४ --- २२०१ -- १०२

मावळ ---- १२,१२५ --- १०,०५२ -- ८३

वेल्हे --- ५०१८ --- ४९९० -- ९९

मुळशी -- ७६६९ -- ६८२५ -- ८९

जुन्नर --- ११,६२९ -- १०८२४ -- ९३

खेड --- ७२८६ -- ६१२४ -- ८४

आंबेगाव -- ५२४२ -- ५७१० -- १०९

भोर -- ७३८३ --- ७७३७ --- १०५

पुरंदर -- १२०८ --- ११०६ -- ९२

एकूण -- ५९,६२७ -- ५५,४७० --- ९२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT