Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : भात शेतीचे वेळापत्रक १५ दिवसांनी पुढे गेले

Paddy Plantation : जून महिन्यातील तीन आठवडे कोरडे गेल्यामुळे जिल्ह्यातील भात शेतीच्या वेळापत्रक पंधरा दिवसांनी पुढे गेले आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : जून महिन्यातील तीन आठवडे कोरडे गेल्यामुळे जिल्ह्यातील भात शेतीच्या वेळापत्रक पंधरा दिवसांनी पुढे गेले आहे. जून महिन्याच्या सरासरीनुसार ३० टक्के तर गतवर्षीच्या तुलनेत २०० मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठवड्यात समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी भात लागवड सुरू केली आहे. जिल्ह्यात दोन टक्केच शेतकरी लावणीत व्यस्त झाले आहेत.

जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ५७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ७८२ मिमी पाऊस झाला होता. यंदा तुलनेत २०० मिमी कमी पाऊस झाला. जून महिन्यामध्ये सरासरी ८०० मिमी पाऊस पडतो. यावर्षी तो तीस टक्के कमी पडला आहे. मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी जिल्हावासियांना प्रतीक्षा करावी लागली.

पहिल्या आठवड्याच्या शेवटी काही ठिकाणी हलका पाऊस पडून गेला होता. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तातडीने पेरण्या करून घेतला. सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या करून घेण्यात आल्या; मात्र पुढे पावसाने विश्रांती घेतली आणि उन्हाचा कडाका सुरू झाला. बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन लांबले. साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार आगमन झाले.

जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड होते. रोपवाटिकांसाठी सरासरी सात हजार हेक्टरवर पेरण्या केल्या जातात. २२ ते २३ जूनला जिल्ह्यातील ६० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पेरण्या केलेल्यांनी आता भात लागवडीला आरंभ केला आहे. काही शेतकऱ्यांना रोपं जगवण्यासाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागली.

आता पाऊस सुरु झाल्यानंतर लावणीची कामे वेगाने केली जात आहेत; परंतु उशिरा पेरणी केलेल्यांना अजून आठ ते दहा दिवस थांबावे लागणार आहे. १५ जुलैपर्यंत लागवडीची कामे पूर्ण होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मोसमी पावसाच्या विलंबामुळे भातशेतीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात रोपवाटिका केलेल्यांनी आता लावणीला आरंभ केला आहे; मात्र २२ जूनला पेरण्या केलेल्यांना किमान पंधरा दिवस तरी रोपांची वाढ होईपर्यंत वाट पहावी लागले. जून कोरडा गेला असला तरीही दुबार पेरण्यांची वेळ येथील शेतकऱ्यांवर आलेली नाही.
- व्ही. व्ही. दळवी, प्रभारी अधिकारी, भात संशोधन केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT