Paddy Crop  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Crop Damage : कांदाटी खोऱ्यात भातपीक गवारेड्यांकडून उद्ध्वस्त

Wild Animal Crop Damage : मॉन्सूनवर अवलंबून असलेल्या आणि वर्षातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या भातपिकावर गवारेड्यांमुळे आलेल्या संकटामुळे कांदाटी खोऱ्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : प्रशासकीयदृष्ट्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असणाऱ्या मात्र भौगोलिकदृष्ट्या केवळ खेड तालुक्याला संलग्न असलेल्या कांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, उचाट गावांमध्ये गवारेड्यांनी भाताचा रुजून आलेला तरव्याची (छोटी भात रोपे) नासधूस केली. खेड ते खोपी मार्गाचे रघुवीर घाट फोडून विस्तारीकरण केलेल्या कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याशी दळणवळणाच्या दृष्टीने जोडले गेले आहे.

मॉन्सूनवर अवलंबून असलेल्या आणि वर्षातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या भातपिकावर गवारेड्यांमुळे आलेल्या संकटामुळे कांदाटी खोऱ्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वन विभागाकडून साधे पंचनामेदेखील केले गेले नाहीत. आता वर्षभर काय खायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. कोयना धरण बांधल्यानंतर अनेक गावे पुनर्वसित झाली तर काही गावकरी त्याच ठिकाणी राहिले.

या गावांतील अनेकजण नोकरीधंद्यासाठी मुंबई-पुण्याला गेले आहेत; मात्र या ठिकाणी राहणारे ग्रामस्थ पारंपरिक भातशेतीवर अवलंबून असतात. यंदा येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पावसाळ्यात भातपेरणी केली. पेरणी करून उगवलेल्या भाताचे तरवे कोयना अभयारण्यात असलेल्या गवारेड्यांनी अक्षरशः खाऊन उद्ध्वस्त केले.

महाबळेश्वर तालुक्याच्या वन विभाग कार्यालयाकडून पंचनामाही झालेले नाहीत. कोयना धरणानंतर या कांदाटी खोऱ्यात वास्तव्याला असणाऱ्या गावांची अवस्था फारच बिकट झाली आहे.

अत्यंत दुर्गम आणि जंगलमय भागात राहत असलेले हे लोक शासनाकडून काही मोठी अपेक्षा ठेवत नाहीत; मात्र पारंपरिक शेती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या येथील शेतकऱ्यांना आवश्यक गोष्टींची पूर्तता व नुकसानभरपाई तरी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरवर्षी गवारेड्यांकडून भातशेतीचे नुकसान होते. आम्ही नेहमीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गवारेड्यांच्या बंदोबस्तासाठी विनंती करत आहोत. पण आमच्या पंचक्रोशीकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते.
- सदानंद मोरे, ग्रामस्थ शिंदी-वळवण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT