Yashada Pune Agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : संस्कृती संवर्धनला उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार

जलदूत २.० प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेस यशदा पुणे येथे जलसंवर्धन क्षेत्रातील शाश्वत कार्यासाठी उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nanded News नायगाव तालुक्यातील मांजरम येथे जलदूत २.० प्रकल्पाची (Jaldoot Project 2.0) यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेस यशदा पुणे येथे जलसंवर्धन (Water Conservation) क्षेत्रातील शाश्वत कार्यासाठी उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुणे येथील सेवावर्धिनी संस्थेच्या सहकार्याने व ऍटलास काप्को कंपनी यांच्या सक्रिय व आर्थिक सहभागातून जलदूत २.० हा जलसंधारणातील पथदर्शी प्रकल्प सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेच्या माध्यमातून २०१९ ते २०२३ या कालावधीत मांजरम (ता. नायगाव) येथे राबविण्यात आला.

या प्रकल्पाचा समारोप ता. १८ मार्च रोजी यशदा पुणे येथे झाला. संस्थेने मांजरम येथे माती, पाणी जतन व संवर्धन विषयी जनजागृती, विविध सर्वेक्षण, तांत्रिक क्षमता, गाव जल सुरक्षा व शाश्वतता आराखडा, केलेल्या कामाचा आर्थिक परिणाम व शाश्वतता, संस्था सक्ष्मीकरण आदी क्षेत्रात यशस्वीपणे कार्य केल्यामुळे संस्थेला जलदूत २.० उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. माजी कुलगुरु, डॉ. नितीन करमाळकर, ऍटलास काप्को कंपनीचे कार्पोरेट एच.आर. प्रमुख कबीर गायकवाड, कंपनीच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी विभागाचे व्यवस्थापक अभिजित पाटील, यशदा जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ. आनंद पुसावळे, सेवावर्धिनी संस्थेचे सचिव सोमदत्त पटवर्धन, कार्यवाह प्रमोद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त संस्थांचा गौरव करण्यात आला.

संस्कृती संवर्धन मंडळाच्या माध्यमातून मांजरम पाणलोट क्षेत्राचे एकात्मिक पद्धतीने विकास करून जलसमृद्ध मांजरम साकार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत.
- पांडुरंग देवराव शिंदे, सचिव संत तुकडोजी महाराज जलव्यवस्थापन समिती, माजरंम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT