Lumpy Skin Disease Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : सिन्नर तालुक्यात दोन गावांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या दोन गावांत ३ जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष समोर आले आहेत.

टीम ॲग्रोवन

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या दोन गावांत ३ जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) झाल्याचा निष्कर्ष समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सावध झाले असून या आजाराचा जनावरांमध्ये संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दोन संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या बाबत निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत आदेश काढले आहेत.

जनावरांमध्ये हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाधित क्षेत्रातील जनावरांचे गोठे निर्जंतुकीकरण करून परिसरातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

जिल्ह्यात ३ प्रकरणे समोर आली आहेत. उपचार केल्यानंतर ही जनावरे बरी झाले आहेत. मात्र त्यांचे बाधित झाल्याचे तपासणीनंतर समोर आल्याने खबरदारी घेण्यात आले आहे. या बाधित क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिघात वावी व पांगरी पशुवैद्यकीय दवाखान्यामधून ३,५०० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.

प्रादुर्भाव आढळून आल्यास यांना संपर्क साधा

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय फोन. ०२५३-२९५९६०६

डॉ. बाबूराव नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मो. ९७६३३३२८७६

डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मो. ९८२२४५५८४१

डॉ. अनंत साखरे, सहाय्यक आयुक्त नाशिक जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, मो. ९८५०१२७८५०

डॉ. संदीप पवार, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, मो. ९७६४१३१३१६

मागीलवर्षी सव्वा सहा लाख जनावरांना लसीकरण केल्याने रोग प्रतिकारक शक्ती टिकून आहे. त्यामुळे प्रादुर्भाव कमी दिसून येत आहे. मात्र, काटेकोर लक्ष घालून सतर्कता बाळगून आहोत. जिल्ह्यात नियंत्रण कक्ष व शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

- डॉ. बाबूराव नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Farmer Death: पीक गेलं, कर्ज वाढलं, मुलीच्या शिक्षणाचा खर्चही पेलवेना; नांदेडमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

Annapurti Grain ATM : आता रेशनसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही; नाशिकमध्ये 'अन्नपूर्ती धान्य एटीएम'ची डिजिटल क्रांती

Farmer Welfare Portal: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे नवे संकेतस्थळ सुरू! सरकारी योजना, अनुदान आणि शेतीची माहिती आता एका क्लिकवर; पाहूयात नव्या संकेतस्थळाची माहिती!

India-New Zealand FTA: भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार लागू, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?

Drought Farming: कमी पाण्यात कोणती आंतरपिके फायदेशीर? ज्वारी, करडई आणि हरभऱ्याचे नियोजन

SCROLL FOR NEXT