Fertilizer
Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

नत्र अर्धाटक्काही नाही,स्फुरद मात्रा `शून्य`च!

Sudarshan Sutaar

सोलापूर : स्वस्तात मिळतेय म्हणून नामवंत कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खताचा (Fertilizer) जेव्हा प्रयोगशाळेत पोलखोल झाला, तेव्हा सर्वच आवाक झाले. या खताच्या नमुन्याची तपासणी खासगी आणि शासकीय प्रयोगशाळेत कऱण्यात आली. त्यात खासगी प्रयोगशाळेत १२:६१:० या खतामध्ये नत्राची मात्रा १२ टक्के हवी, ती केवळ ०.११ टक्के, तर स्फुरदची मात्रा ६१ टक्क्यांऐवजी चक्क शून्य, तर शासकीय प्रयोगशाळेत दोन्हीही घटकाचे प्रमाण अर्धा टक्काही नसल्याचे निदर्शनास आले.

खतातील भेसळीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोहोळ आणि उत्तर सोलापुरातील खताचे नमुने पुण्याच्या कृषी सहसंचालक विभागाचे तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) अशोक पवार यांनी घेतले. १२:६१:० या खताच्या ग्रेडमध्ये नत्र १२ टक्के आणि स्फुरदाचे प्रमाण ६१ टक्के आवश्‍यक होते. नमुना तपासणीसाठी पुण्याच्या खत नियंत्रण प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवला.

त्याचा अहवाल उपलब्ध झाला असून, त्यात नत्राचे प्रमाण अवघे ०.३३ टक्के तर स्फुरदाचे प्रमाण ०.३५ टक्के असल्याचे आढळले. शास्त्रीयदृष्ट्या साधारण दोन्ही घटकांमध्ये एकूण खताच्या ग्रेडमध्ये अर्धा टक्क्यांपर्यंत तूट एकवेळ ग्राह्य धरले जाते. पण, इथे तर खतातील एकूण घटक किमान अर्धा टक्काही नाही, असे निदर्शनास आले.

त्याशिवाय याच खताचे नमुने तपासणीसाठी सोलापुरात खासगी प्रयोगशाळेकडेही दिले. तिथे तर १२ :६१:० या खतामध्ये नत्राची मात्रा १२ टक्के हवी, ती केवळ ०.११ टक्के, तर स्फुरदची मात्रा ६१ टक्क्यांऐवजी चक्क शून्य असल्याचे पुढे आले. त्यामुळे या खतात भेसळ असल्याचे या दोन्ही अहवालावरून शिक्कामोर्तब झाले.

शासकीय प्रयोगशाळेतील चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात खतात भेसळ आहे, हे सिद्ध झाले आहे. आम्ही आमच्या पातळीवर कारवाई केली आहे, पोलिसांकडेही फिर्याद दिली आहे. आता पुढील तपास पोलिस करतील. त्यातून दोषींवर कारवाई होईल.
अशोक पवार, तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण), विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

Mango Market : नागपूर-अमरावतीत स्थानिक आंबा वाणांचे दर दबावात

SCROLL FOR NEXT