Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : शेतकऱ्यांना अग्रिम विमा भरपाई देण्याचे आदेश

Crop Damage : या वर्षी (२०२३) पावसाळ्यात ता. २९ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पालम, पूर्णा या ७ तालुक्यांतील ११ मंडलांमध्ये सलग २१ ते २२ दिवस पावसाचा खंड पडला.

Team Agrowon

Parbhani News : या वर्षी (२०२३) पावसाळ्यात ता. २९ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पालम, पूर्णा या ७ तालुक्यांतील ११ मंडलांमध्ये सलग २१ ते २२ दिवस पावसाचा खंड पडला. परिणामी, सोयाबीनच्या यंदाच्या उत्पादनात मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ६४ ते ६७ टक्के घट अपेक्षित आहे.

त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीमबाबी अंतर्गत सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य विमा भरपाईतून २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा पीकविमा योजना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी शुक्रवारी (ता. २५) काढलेल्या अधिसूचनेद्वारे विमा कंपनीला दिले आहेत.

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई निश्‍चित करण्याच्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील अधिसूचित विमा क्षेत्र (मंडळ) घटकातील सोयाबीन या अधिसूचित पिकांच्या प्रातिनिधिक सूचकांच्या (त्यात पीक परिस्थिती अहवाल, पर्जन्यमान अहवाल, स्थानिक प्रसारमाध्यमांचे वार्तांकन, दुष्काळसदृश परिस्थिती) आधारे राज्य शासनाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला.

त्यानुसार सिंगणापूर, दैठणा (ता. परभणी), जिंतूर (ता. जिंतूर), सेलू (ता. सेलू), केकरजवळा (ता. मानवत), पाथरी, बाभळगाव (ता. पाथरी, रावराजूर, पेठशिवणी (ता. पालम), ताडकळस, लिमला (ता. पूर्णा) या ११ मंडलांतील सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन हे मागील ७ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे अपेक्षित उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. विमा कंपनीने ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून एका महिन्याच्या आत सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करावी, असे आदेश गावडे यांनी दिले आहेत.

या ११ मंडलांतील विमाधारक शेतकरी हंगामाच्या पीक कापणी प्रयोगाद्वारे येणाऱ्या उत्पादनाच्या आधारे निश्‍चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील. नुकसान भरपाईची अग्रिम रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे यांनी दिली.

सोयाबीन उत्पादकता स्थिती (प्रतिहेक्टरी क्विंटलमध्ये)

मंडल मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादन सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादन उत्पादतील घट टक्के

सिंगणापूर ११.५६ ४.०४ ६५

दैठणा ११.०६ ३.७६ ६६

जिंतूर ९.७० ३.२० ६७

सेलू ११.७९ ३.८९ ६७

केकरजवळा ११.९७ ४.०६ ६६

पाथरी १२.५१ ४.२५ ६६

बाभळगाव ११.८१ ४.०१ ६६

रावराजूर ११.९५ ४.०६ ६६

पेठशिवणी ९.९३ ३.५७ ६४

ताडकळस ११.१३ ४.०० ६४

लिमला १०.३२ ३.७१ ६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Skymate Monsoon 2026 : २०२६ च्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता; 'स्कायमेट'चा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज;

Dairy Business: पाटील बंधूंचा नावारूपाला आलेला श्री डेअरी फार्म

Zero Tillage Farming: खर्च, मजुरी कमी करण्यासाठी शून्य मशागत तंत्राने शेती

Cotton Farmer Challenges: पांढऱ्या सोन्याची शोकांतिका

Indian Farmer Challenges: आठ हात लाकूड, नऊ हात धिपली

SCROLL FOR NEXT