Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

ऑक्टोबर महिन्यात हस्त नक्षत्रामध्ये परतीचा पाऊस सतत पडल्याने काळ्या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून कांदा, सूर्यफूल, ज्वारी, तूर, सोयाबीन, मका, बाजरी, ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कांदा, सूर्यफूल, ज्वारी, तूर, सोयाबीन, मका, बाजरी, ऊस व इतर पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाल्याने त्यांचे पंचनामे (Crop Damage Survey) करण्याचे सुधारित आदेश सर्व तलाठ्यांना दिल्याची माहिती महसूल नायब तहसीलदार सुधाकर धांईजे यांनी दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात हस्त नक्षत्रामध्ये परतीचा पाऊस सतत पडल्याने काळ्या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून कांदा, सूर्यफूल, ज्वारी, तूर, सोयाबीन, मका, बाजरी, ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

यात सूर्यफूल, मका जागेवर जळून गेले, तर कांदा शेतामध्ये नासून गेला. उसासारख्या पिकात गेली तीन महिने पाणी साचून राहिल्यामुळे पाण्यावर शेवाळयाचा थर आल्याने जमीन क्षारयुक्त बनत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. परिणामी, साचून राहिलेल्या पाण्यामुळे उसाचे वजन घटले असून वाढही खुंटली शिवाय गेल्या महिन्यात रब्बी पेरणी वेळी सतत पडलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी ही पिवळी पडली आहे.

तसेच पेरलेले काही ठिकाणी न उगवल्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात महसूल विभागाने केवळ कांदा व सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश काढले. जळालेल्या सूर्यफूल पिकाचे पंचनामे करण्याची मागणी तलाठ्याकडे केल्यानंतर आम्हाला अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे केवळ तोंडी आदेश दिले असून, सूर्यफुलाबाबत सांगितले नसल्याचे सांगून त्याचे पंचनामे करण्याचे टाळल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. पण आता नव्याने सर्वच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याबाबत सुधारित आदेश काढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT