Horticulture Development Mission Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Horticulture Development Mission : फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळबागांचे होणार पुनरुज्जीवन

Horticulture Scheme : शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Team Agrowon

Pune News : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (एनएचएम) २०२३-२४ अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, विदेशी फळे, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी याकरिता क्षेत्र विस्तार कार्यक्रम प्राप्त झाला असून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

अभियानाअंतर्गत घटकनिहाय अनुदान :

फुले लागवड : कट फ्लॉवर्स - खर्च मर्यादा १ लाख रुपये प्रति हेक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार रुपये प्रति हेक्टर तर इतर शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

कंदवर्गीय फुले ः खर्च मर्यादा १ लाख ५० हजार रुपये प्रति हेक्टर राहील. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार रुपये प्रति हेक्टर तर इतर शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

सुटी फुले ः खर्च मर्यादा ४० हजार रुपये प्रति हेक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार रुपये प्रति हेक्टर तर इतर शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

मसाला पीक लागवड : बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकासाठी खर्च मर्यादा ३० हजार प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ४० टक्के रक्कम किंवा १२ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. बहुवर्षीय मसाला पिकासाठी खर्च मर्यादा ५० हजार रुपये असून एकूण खर्चाच्या ४० टक्के रक्कम किंवा कमाल २० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

विदेश फळपीक लागवड : ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी खर्च मर्यादा ४ लाख रुपये प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १ लाख ६० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. स्ट्रॉबेरीसाठी खर्च मर्यादा २ लाख ८० हजार रुपये प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १ लाख १२ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. अवॅकॅडोसाठी खर्च मर्यादा १ लाख रुपये प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन : यासाठी खर्च मर्यादा ४० हजार रुपये प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

येथे करा अर्ज...

विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT