Orange  Agrowon
ताज्या बातम्या

Orange : कृषी विज्ञान केंद्राद्वारे संत्रा गट शेती कार्यक्रम

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गट शेती उपक्रमांतर्गत मौजे बेलखेडा (ता. रिसोड) येथे निर्यातक्षम संत्रा उत्पादन तंत्र व शिवार फेरी कार्यक्रम झाला.

टीम ॲग्रोवन

वाशिम : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गट शेती उपक्रमांतर्गत मौजे बेलखेडा (ता. रिसोड) येथे निर्यातक्षम संत्रा उत्पादन तंत्र व शिवार फेरी कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या तज्ञ निवृत्ती पाटील यांची उपस्थित होते. सरपंच कैलाश देव्हळे, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत उलेमाले, कृषी सहाय्यक इंगोले यांची उपस्थिती होती. बेलखेडा, पार्डी व परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांत्रिक सत्रात निवृत्ती पाटील यांनी विदर्भातील संत्रा पिकाची सद्य:स्थिती विषद करून वाशीम जिल्ह्यातील संत्रा पिकाची आणि विशेषतः मृग बहराची परिस्थिती मांडली. वाशीम जिल्ह्याला संत्रा पिकाद्वारे नवीन ओळख निर्माण होत असून गट शेती उपक्रमांतर्गत उत्कृष्ट बागा निर्माण होऊन उच्च प्रतीचे उत्पादन मिळत असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने उत्कृष्ट प्रतीची फळे उत्पादित करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. सोबतच एकात्मिक अन्नद्रव्ये व ओलीत व्यवस्थापन आणि कीड व रोग नियंत्रण या विषयी सविस्तर माहिती दिली.

श्री. तोटावार यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात कृषी विभागाच्या रोजगार हमी योजना, पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, पॅकहाऊस, शेततळे इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राद्वारे सुरू करण्यात आलेल्या गट शेती उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढत असून जास्तीत जास्त संत्रा उत्पादकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

संत्रा उत्पादक गटाच्या वतीने जगदीश देव्हळे यांनी मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देत वायबार, कोळी, फुलकिडे इत्यादी अडचणी दूर होऊन उच्च प्रतीचे उत्पादन येत असल्याचे सांगितले. तांत्रिक सत्रानंतर शास्त्रज्ञ, अधिकारी व संत्रा उत्पादकांनी हरिभाऊ देव्हळे, जगदीश देव्हळे, संतोष देव्हळे आणि इतर शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी करून निरीक्षणाआधारे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार देव्हळे, जगदीश देव्हळे, विठ्ठलराव जाधव, बाळूभाऊ ठाकरे, हरीभाऊ देव्हळे व इतर शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT