SYSTEM
ताज्या बातम्या

Drought Prone Area : सरकारमधील मंत्री, आमदारांच्या तालुक्यांचाच दुष्काळात समावेश

Drought Conditions : धुळे जिल्ह्यात साक्री, धुळे व अर्धा शिरपूर तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. तरीही धुळे जिल्ह्यावर अन्याय केला आहे,’’ असा संताप शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी व्यक्त केला.

Team Agrowon

Dhule news : ‘‘राज्यात ९० तालुक्यांत सर्वदूर दुष्काळी परिस्थिती असताना विद्यमान शिंदे सरकारने भाजप, शिंदे व अजित पवार गटाच्या ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. धुळे जिल्ह्यात साक्री, धुळे व अर्धा शिरपूर तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. तरीही धुळे जिल्ह्यावर अन्याय केला आहे,’’ असा संताप शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी व्यक्त केला.

‘‘राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना कमी पर्जन्यमान, पावसाचा २१ दिवसांचा खंड अंतिम आणेवारी याचे निकष न तपासता राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला गेला. दुष्काळ जाहीर झालेले सर्व ४० तालुके सत्तेतील भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाच्या आमदारांचे आहेत, असा प्रथम दर्शनी निष्कर्ष निघतो. (उदा ः नंदूरबार (मंत्री विजय गावित), चाळीसगाव (आमदार मंगेश चव्हाण) भोकरदन ( मंत्री रावसाहेब दानवे), दौंड (ॲड. राहुल कुल), माढा (आमदार. बबनराव शिंदे) अशा प्रकारे दुष्काळ जाहीर करताना दुजाभाव सरकारने केला. या आमदार, मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यातील इतर दुष्काळग्रस्त तालुक्यांचा विसर का पडला ?, ’’ असा प्रश्न प्रा. पाटील यांनी उपस्थित केला.

‘‘दुष्काळी तालुक्यात धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, नंदूरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा या तालुक्यांचा समावेश झाला असता तर शेतकऱ्यांना महसुल सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, सक्तीच्या कर्जवसुलीस स्थगिती, वीज बिलात सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी, टँकरने पाणी पुरवठ्याची सुविधा मिळाल्या असत्या. पीकविमा नुकसान भरपाई मिळाली असती,’’ असे प्रा. पाटील यांनी सांगितले. शिवसेना (उबाठा) च्या वतीने दिवाळीनंतर गावा-गावांत जाऊन शेतकऱ्यांचे याबाबत प्रबोधन करून जागृती करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना उठाव करावा लागेल’

‘‘संपूर्ण धुळे व नंदूरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यासाठी तसेच पिकविम्याच्या अग्रिम रक्कमेसह १०० टक्के परतावा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करून उठाव करावा लागेल,’’ अशी भूमिका प्रा. पाटील यांनी मांडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT