Water Storage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Storage : मध्यम प्रकल्पात निम्माच पाणीसाठा

Nanded Water Storage : जिल्ह्यात अर्धाअधिक पावसाळा संपत आला असताना मध्यम प्रकल्पासह एकूण १०४ प्रकल्पातील पाणीसाठा मात्र निम्म्यावर आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Nanded News : नांदेड :  जिल्ह्यात अर्धाअधिक पावसाळा संपत आला असताना मध्यम प्रकल्पासह एकूण १०४ प्रकल्पातील पाणीसाठा मात्र निम्म्यावर आहे. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पात ४०६.१६ दलघमीनुसार ५६.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात ५३५.२२ दलघमीनुसार ७३.५१ टक्के पाणीसाठा होता.  

नांदेड जिल्ह्यात यंदा जूनमध्ये पावसाअभावी धरणसाठ्यात कमालीची घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता. नांदेड जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पात २०३.३९ दशलक्ष घनमीटरनुसार २७.९३ टक्क्यांवर खाली आला होता. यानंतर जुले महिन्यात झालेल्या पावसाने २०० दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढला आहे. सध्या जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात ४०८.१६ दलघमीनुसार ७३.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

परंतु हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत १२७.०६ दलघमीनुसार १७.४५ टक्के कमी आहे. यातील नऊ मध्यम प्रकल्पात मात्र हा साठा निम्म्यावर आहे.
सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ६६.८० दलघमीनुसार ८२.६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ६९.९८ दलघमीनुसार ५०.६३ टक्के, यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ७०.०६ दलघमीनुसार ५०.३८ टक्के, चार कोल्हापुरी बंधाऱ्यात शून्य टक्के, ८० लघू प्रकल्पात १५९.१० दलघमीनुसार ९२.०७ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ४२.२२ दलघमीनुसार २२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पात ४०८.१६ दलघमीनुसार ५६.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT