Kharip Sowing Agrowon
ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या सात टक्के पेरण्या

शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन खरिपाची तयारी केली होती. अनेकांनी खते, बियाण्यांची खरेदी केली होती. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यात पुरंदर, बारामती वगळता उर्वरित भागात कुठेही पाऊस पडला नाही.

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणेः जून महिना सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे. जूनच्या सुरुवातीला पाऊस न पडल्याचा परिणाम खरिपाच्या पेरणीवर (Kharip Sowing) झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एक लाख ८४ हजार २७४ हेक्टरपैकी अवघे १४ हजार ३१९ हेक्टर म्हणजेच सरासरी ७ टक्के पेरणी झाली आहे. पश्‍चिमेकडील पट्ट्यात भात रोपवाटिकेची कामे वेगाने सुरू असून बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांच्या अत्यंत कमी पेरण्या झाल्या आहेत.

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज (Crop Loan) घेऊन खरिपाची तयारी केली होती. अनेकांनी खते, बियाण्यांची खरेदी केली होती. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यात पुरंदर, बारामती वगळता उर्वरित भागात कुठेही पाऊस पडला नाही.

दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पावसाचा चांगलाच खंड पडला. बारामतीत ९७ मिलिमीटर, आंबेगावात ८४, तर जुन्नर व इंदापुरात ७५ मिलिमीटर एकूण पाऊस पडला. तर हवेली, मुळशी, भोर, मावळ, पुरंदर तालुक्यात ५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरण्या वेळेवर होऊ शकल्या नाही.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात पडण्यास सुरुवात केली असली, तरी पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौड, खेड भागात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. त्यामुळे या भागात अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी प्रमाण अत्यंत कमी आहे.

उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव तालुक्यात बऱ्यापैकी खरिपाच्या पेरण्या (Kharip Sowing) झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी याच काळात ८० हजार ८७० हेक्टर म्हणजेच ४४ टक्के पेरण्या झाल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पेरणीच्या क्षेत्रात चांगलीच घट झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात भाताचे (Paddy) सरासरी ६० हजार १०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी सध्या ३ हजार ८९३ हेक्टरवर रोपवाटिका आहेत. बाजरीचे सरासरी ३७ हजार ७६० हेक्टरपैकी १ हजार ७५० हेक्टर पेरणी झाली आहे. मक्याची (Maize) २५ हजार हेक्टरपैकी ६४५ हेक्टर, मूग पिकांची १३ हजार ८०० हेक्टरपैकी १ हजार ९३८, सोयाबीनची ३७ हजार ५०० हेक्टरपैकी एक हजार ८५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वेळेवर पाऊस न झाल्याने बहुतांशी शेतकरी सोयाबीन (Soybean) पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे.

यंदा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पुरेसा पाऊस पडला नाही. आता उशिराने पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस व जमिनीत ओलावा झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये.
ज्ञानेश्‍वर बोठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT