Onion Fungal Disease Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : बुरशीमुळे कांदारोप संकटात

मागील महिन्यातील सततच्या पावसाने उन्हाळी कांद्यासाठी टाकलेल्या कांदा बियाणाच्या (उळे) उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे.

टीम ॲग्रोवन

देवळा : मागील महिन्यातील सततच्या पावसाने उन्हाळी कांद्यासाठी (Summer Onion) टाकलेल्या कांदा बियाणाच्या (Onion Seed) (उळे) उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. अनेक शेतातील कांदा रोपे (Onion Plant) मरू लागल्याने ‘महागाचे बियाणे जमिनीतच’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

येथील कसमादे भागात रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी लाल कांदा कमी असल्याने उन्हाळ कांदा चांगले पैसे देऊन जाईल, असा शेतकऱ्यांचा व्होरा आहे. त्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादक शेतकरी कांदा बियाण्याची पेरणी करीत रोप तयार करतात.

यंदाही अनेक शेतकऱ्यांनी कांद्यासाठी शेत मोकळे ठेवत बियाण्याची पेरणी केली. मात्र, मध्यंतरी सततच्या पावसाने जमिनीत बुरशी निर्माण झाली आहे. यामुळे कांदा रोपाच्या मुळ्या कमकुवत होऊन रोपे मरू लागली आहे. यामुळे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला. कांदा रोप तयार करतेवेळी प्रमाणात पाणी असणे गरजेचे असते.

एकीकडे कांद्याला भाव नाही अन्‌ दुसरीकडे उळे इतके महाग! त्यात उळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची अवस्था अवघड झाली आहे. शासनाने कांद्याची भाववाढ करून दिलासा द्यावा.
अशोक मोरे, भावडे (ता. देवळा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT