मुकुंद पिंगळे
सोग्रस, ता.चांदवड : अतिवृष्टीच्या तडाख्यात उन्हाळ कांदा लागवडीसाठी तयार केलेल्या रोपवाटिका मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा नुकसान सोसून उन्हाळा कांदा हंगामाला सामोरे जात आहे .येथील शेतकरी बबन परसराम गांगुर्डे यांच्या कांदा रोपवाटीका तयार करण्याचे शेतात झालेले कामकाज.
मुंगसे, ता. सटाणा: शेतकऱ्यांनी दुबार रोपे टाकली. मात्र यंदा नुकसान अधिक राहिले. त्यामुळे सुधारीत पद्धतीचा अवलंब महत्वाचा आहे, हे दिसून आले.
अंतापुर, ता.सटाणा: गादी वाफा पद्धतीचा अवलंब, पेरणीपूर्व बीजप्रक्रिया व घरगुती उत्पादित गुणवत्तापूर्ण बियाण्याच्या वापरामुळे रोपनिर्मिती दर्जेदार झाल्याचे रोहिदास नानाजी जाधव यांच्या शेतात दिसून आले.
अंतापुर, ता.सटाणा: गुणवत्तापूर्ण तयार झालेली रोपे
चास, ता. सिन्नर: लागवडीसाठी कांदा उत्पादक शेतकरी शिवाजी ढाकणे यांच्या शेतात कांदा लागवडीसाठी रोपे उपटण्याची लगबग
नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागात रब्बी उन्हाळ कांदा लागवडी हळूहळू वेग घेत आहेत.