Onion Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Onion Cultivation : खानदेशात कांदा लागवड तयारी वेगात

Onion Crop : क्षेत्र १० हजार हेक्टरवर स्थिरावण्याचा अंदाज

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Khandesh Onion Cultivation : जळगाव ः खानदेशात कांदा लागवडीची तयारी सुरू झाली आहे. धुळ्यातील काही भागात लागवड सुरूदेखील झाली आहे. यंदा लागवड १० हजार हेक्टरवर स्थिर राहील, असा अंदाज आहे.

धुळ्यात साडेपाच ते सहा हजार हेक्टरवर लागवड होईल. नंदुरबार ६०० ते ७०० हेक्टरवर आणि जळगाव जिल्ह्यात साडेतीन ते चार हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. खरिपातील लागवड धुळ्यात घटणार नाही किंवा वाढणारदेखील नाही. या भागात दरवर्षी लागवड स्थिर असते. जळगाव जिल्ह्यात काही वेळेस लागवड कमी होते किंवा लागवडीत वाढ होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षांपासून कांद्याला हवे तसे दर नसल्याने शेतकरी लागवड वाढविणार नाहीत, असे दिसत आहे.

लागवडीसंबंधी धुळे व जळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे ३०० हेक्टरवर रोपवाटिका आहेत. त्यामधील कांदारोपांची स्थिती चांगली आहे. अतिजोरदार किंवा सततचा पाऊस अशी स्थिती नाही. यामुळे रोपांची मरतुक कमी आहे. तसेच वाढही बऱ्यापैकी आहे. कांदा रोपवाटिका धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा भागात अधिक आहे. जळगावात चोपडा तालुक्यातील धानोरा, अडावद, मराठे, लासूर, यावलमधील किनगाव, डांभुर्णी, साकळी, धरणगावमधील पथराड, वंजारी, एरंडोलातील खर्ची आदी भागात रोपवाटिका आहेत.

खुले बियाणे खरेदीस पसंती

धुळे जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आगाप लागवड सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी करार शेती पद्धतीने लागवडीलाही पसंती दिली आहे. कांद्याला दर कमी आहेत. परंतु बाजारात बियाणे अव्वाच्या सव्वा दरात मिळत आहे. १०००, १२००, १५००, २००० रुपये प्रतिकिलो या दरात बाजारात बियाणे आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतच आहे. बाजारात बियाणे महाग असल्याने अनेकांनी पॅकिंगशिवाय असलेल्या खुल्या बियाण्याची खरेदी गावोगावी शेतकऱ्यांकडून करण्यास पसंती दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Kumar Saptarshi Tribute: डॉ. सप्तर्षींचा विचार अखंडपणे जपणे गरजेचेच शरद पवार यांचे आवाहन

Drone Pilot Training MOU: ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ‘वनामकृवि’चा ‘सारथी’सोबत करार

Goat Deformity Case: गौंडगाव येथील बोकडामध्ये दिसली दुर्मीळ नैसर्गिक विकृती; पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञाकंडून तपासणी

Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे

Women Farmers Empowerment Council: राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन

SCROLL FOR NEXT