solapur APMC Agrowon
ताज्या बातम्या

Solapur Onion Issue : सोलापुरात ‘जनहित’कडून कांदा लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न

Onion Export : जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २३) कांद्याच्या निर्यातीवरील शुल्कवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूर बाजार समितीमध्ये आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Solapur Onion News : कांद्यावरील निर्यातशुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे, ही शुल्कवाढ तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २३) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तसेच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, ही शुल्कवाढ मागे घेतली नाही, तर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करू, असा इशारा या वेळी देशमुख यांनी दिला.

आज सकाळपासूनच या आंदोलनासाठी कार्यकर्ते हैदराबाद रस्त्यावरील बाजार समितीच्या परिसरात जमू लागले होते. तसेच या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीही मोठा बंदोबस्त लावला होता. सकाळी दहाच्या सुमारास कांद्याचे लिलाव सुरू होतात.

ते बंद पाडण्याच्या उद्देशाने संघटनेने हे आंदोलन या ठिकाणी पुकारले होते. त्यानुसार सकाळी जनहित संघटनेचे कार्यकर्ते देशमुख यांच्यासह थेट कांदा सेलहॅालमध्ये गेले आणि तिथे सरकारविरोधात मोठ्याने घोषणाबाजी करत कांद्यावरील निर्यातशुल्कवाढ तातडीने मागे घ्या, अशी मागणी करत निदर्शने सुरू केली. त्या आधी येथे कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशीही कार्यकर्ते बोलून त्यांना आपली भूमिका समजावून सांगत होते. पण आंदोलन सुरू होताच, शेतकऱ्यांची वाढती संख्या पाहून, पोलिसांनी कार्यकर्त्यांना लगेच ताब्यात घेतले.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याला बऱ्यापैकी दर मिळतो आहे, सामान्य ग्राहकांचीही अडचण नाही. पण सरकारला आता ही दुर्बुद्धी कुठून सुचली, कोण जाणे, जेव्हा दर कमी होता, तेव्हा खरेदीचा हा निर्णय का घेतला नाही. आता चार पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत, तर निर्यातशुल्कात ४० टक्क्यांची वाढ करून त्यांना खाईत टाकले आहे. आता कांदा खरेदी वगैरे हे सगळे नाटक आहे. शेतकऱ्यांचे सरकार म्हणत मोदी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंजीर खुपसत आहेत.
- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Pests: टोमॅटो पिकातील रस शोषक किडींना घाला आळा

Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Tanker Water Supply: मागेल त्याला टँकरने पाणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Irrigation Water Rates: उपसा सिंचनच्या पाणीवापराचे दर निश्चित; कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT