Nashik Onion Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Onion : नाशिकचा कांदा पहिल्यांदाच रेल्वेने मणिपूर राज्यात

Manipur Onion News : अंकाई स्टेशन मालधक्कावरून पोहोचला खोंगसोंग स्थानकावर

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik Onion In Manipur : नाशिक : खरीप, लेट खरीप व रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातून आता पहिल्यांदाच रेल्वेने कांदा मणिपूर राज्यात गेला.

हिंसाचाराच्या घटनांनी मणिपूरच्या सध्या धुमसत आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत कांद्याने भरलेली ही मालगाडी २,८०१ किलोमीटरचे अंतर कापत सशस्त्र पोलिस बंदोबस्तात मणिपूरमधील खोंगसोंग रेल्वे स्थानकात दाखल झाली.

मनमाड (जि. नाशिक) जवळील अंकाई स्टेशन मालधक्कावरून २२ कांदा वॉगन असलेली मालगाडी गुवाहाटी जवळील चांगसरी स्टेशन येथे बुक करण्यात आली होती. त्यातील ६ वॅगन कांदा मणिपूर राज्यातील खोंगसोंग येथे प्रथमच पाठविण्यात आला.

ही मालगाडी सोमवारी (ता. २४) रोजी दुपारी ४ वाजता मालगाडी खोंगसोंग (मणिपूर)रेल्वे स्थानकावर पोहोचली. पहिल्यांदाच ईशान्य भारतात रेल्वेने कांदा पोहोचविला गेल्याने या महत्त्वपूर्ण घटनेची दखल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली असून, तसे ट्विट त्यांनी केले. देशभरातून मनमाड रेल्वे स्थानकातून विविध प्रकारचा शेतीमाल पाठविला जातो.

याच स्थानकांतर्गत असलेल्या अंकाई येथील मालधक्क्यावरून मालगाडी कांद्याने भरण्यात आली. येथून ही रेल्वे खोंगसोंग (मणिपूर) येथे पोहोचली.

कांद्यासह, बटाटा, तांदूळ व साखर रेल्वेने पुरवठा
जिल्ह्यात उत्पादित होणारा हा कांदा रेल्वे वॅगनद्वारे मनमाड रेल्वे स्थानकातून परराज्यांत पाठविला जातो. प्रामुख्याने उत्तर भारत आणि पश्चिम बंगालमध्ये हा कांदा मोठ्या प्रमाणात जात असतो.

प्रथमच ईशान्य भारतात रेल्वेद्वारे मिश्रमाल वाहतूक जीवनावश्यक वस्तू असलेल्या कांद्यासह बटाटा, तांदूळ, साखर आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन ही रेल्वे मालगाडी खोंगसोंग (मणिपूर) रेल्वे स्थानकावर आली, असे ट्विट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. देशात सर्वदूर जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्द असल्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने या निमित्ताने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी ३४३.९९ कोटींची मान्यता

Dark Sky Destination : उधमाळ येथे होणार ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’

Cable Thieves Arrested : शेतकऱ्यांच्या मोटारीचे केबल चोरणारे जेरबंद

Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेतून परताव्यांबाबत संभ्रम

Solapur Drought : सोलापूरवर दुष्काळाचे सावट; पावसाची ५३ टक्के तूट

SCROLL FOR NEXT