ताज्या बातम्या

Covid Compensation : कोविडमुळे पालक गमावलेला एकही बालक मदतीपासून वंचित राहू नये

कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेला एकही बालक मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी येथे दिल्या.

Team Agrowon

सोलापूर : कोविडमुळे (Covid) एक किंवा दोन्ही पालक गमावलेला एकही बालक मदतीपासून (Covid Compensation) वंचित राहू नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी येथे दिल्या. कोविड १९ मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

या बैठकीस तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, परिविक्षा अधिकारी नितीन इरकल, युनिसेफचे जिल्हा समन्वयक विकास कांबळे आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, मिशन वात्सल्य अंतर्गत शिधा पत्रिका, वारस प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आदि योजनांचा लाभ देताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने करावे, यासाठी महसूल विभाग व विधी सेवा प्राधिकरणची आवश्यकतेनुसार मदत घ्यावी. तसेच, निराधार, विधवा महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कार्यावाही करावी, असे त्या म्हणाल्या.

यावेळी पी. एम. केअर फॉर चिल्ड्रेन योजना, राज्य शासकीय योजना, रस्त्यावरील मुलांचा विषय, बाल न्याय निधी, मिशन वात्सल्य आदी योजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. या वेळी संरक्षण अधिकारी यांनी बालकांना मदत मिळवून देण्यामध्ये चांगले काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले

पालक गमावलेल्या बालकांना मदत

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी यासंदर्भातील विविध योजनांच्या कार्यवाहीची माहिती दिली. ते म्हणाले, कोविड १९ मुळे दोन्ही किंवा एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या एक हजार १५२ आहे. पी.एम.केअर फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्व ४१ लाभार्थींच्या पोस्ट खात्यावर प्रत्येकी १० लाख रुपये जमा केले आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या ४३ बालकांना मागील आठ महिन्यांचे तर एक पालक गमावलेल्या एक हजार १०९ बालकांना मागील सहा महिन्यांचे प्रत्येकी ११०० रुपये प्रतिमाहप्रमाणे डीबीटीद्वारे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Pest Management: सद्यःस्थितीत कपाशीवर आढळणाऱ्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

Agriculture Department Issue: ऐन हंगामात कृषी विभागाची हाराकिरी

Global Onion Export: धोक्याची चाहूल, उचला योग्य पाऊल

Rainfall Deficit: नद्यांनी वेढलेल्या पाणीदार शिवारात पावसाची ‘आस’

Farmer Company Fraud: शेतकरी कंपन्यांची सव्वा कोटीची फसवणूक

SCROLL FOR NEXT