Electricity Connection Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Connection : ‘महावितरण’ची नवीन वीजजोडणी आता २४ तासांत

Electricity : जिल्ह्यात नवीन वीज जोडणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जावर तातडीने कार्यवाही करीत २४ तासांत वीजजोडणी देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Electricity Bill : अकोला ः जिल्ह्यात नवीन वीज जोडणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जावर तातडीने कार्यवाही करीत २४ तासांत वीजजोडणी देण्यात येणार आहे. याची सुरुवात अकोला शहरातील पाच ग्राहकांना २४ तासांत नवीन वीजजोडणी देऊन करण्यात आली. अर्ज करताच तत्काळ वीजजोडणी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विविध पावले उचलली असून, त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांना वेगाने नवीन वीजजोडणी देण्याच्या सूचना केल्या आहेत. अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रेय पडळकर यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी पुढाकार घेत नवीन वीज जोडणीसाठी प्राप्त अर्जावर झटपट वीजजोडणी देण्यासाठी २४ ते ४८ तासांत वीजजोडणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शहरी भागात २४ तासांत, तर ग्रामीण भागात ४८ तासांत वीजजोडणी देण्यावर महावितरणचा भर राहणार आहे.

या मोहिमेअंतर्गत नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर तत्काळ पुढील काही तासांत त्या स्थळाचा सर्व्हे करून नवीन जोडणीसाठी नेमके किती पैसे भरायचे त्याची माहिती ग्राहकांना मोबाइलवरच देण्यात येणार आहे. ग्राहकांना झटपट पैसे भरता यावे म्हणून ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था करून त्याची पोच व्हॉट्सअॅपवर पाठवायची व पावती मिळाली की तातडीने मीटर बसवून नवीन वीजजोडणी द्यायची अशी कार्यपद्धती या मोहिमेत राहणार आहे.

ग्राहकाने अर्ज करताच २४ तासांत जोडणी देता यावी यासाठी प्रलंबित अर्ज निकाली काढणे आणि नव्या अर्जांनुसार झटपट वीजजोडणी देणे असे काम महावितरणने संचालक संचालन संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT