Flood Agrowon
ताज्या बातम्या

Damaged Bridge : अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

तळोंदा व पाथर्डे (ता. चाळीसगाव) गावात जाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या सांगवी रस्त्यावरील पूल अर्धा तुटलेला आहे.

टीम ॲग्रोवन

चाळीसगाव, जि. जळगाव : तळोंदा व पाथर्डे (ता. चाळीसगाव) गावात जाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या सांगवी रस्त्यावरील पूल (Bridge Damaged) अर्धा तुटलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील वर्षी ३० ऑगस्टच्या मध्यरात्री अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. अनेकांची घरे, गुरेढोरे वाहून गेली होती. याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला होता. दरम्यान, याच वेळी सांगवीमार्गे तळोंदा येथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील पूल अर्धा वाहून गेला होता. या नुकसानाची लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली होती.

मात्र, तेव्हापासून या पुलाची साधी दुरुस्तीदेखील न झाल्याने आजही वाहनधारकांना येथून अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पूल तुटलेला असल्याने गावात ब देखील सुरळीत येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या दोन्ही गावांमधील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीचा माल चाळीसगाव बाजारात विक्रीसाठी आणताना या पुलावरून तारेवरची कसरत करून आणावा लागतो. शिवाय गावातील वयोवृद्धांचे बँक खाते जवळच्या रांजणगाव येथील बँकांमध्ये असल्याने त्यांना पगाराचे पैसे काढण्यासाठी याच पुलावरून जावे लागते.

लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी

मागील वर्षी पूल तुटल्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. या पुलाअभावी होणारी गैरसोय लक्षात घेता, खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सरपंच ज्योती राठोड यांनी केली आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करणेच सोयीचे होणार आहे.

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या या पुलामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत आहेत. मागील वर्षी पूल अर्धा तुटल्यानंतर आता आणखी पडका झाला आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची वाट न पाहता तसेच या पुलाची दुरुस्ती न करता, नव्याने चांगल्या दर्जाचा पूल बांधणेच उचित ठरणार आहे. - ज्योती राठोड, सरपंच, तळोंदा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT