Onion Market Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : कांद्यासाठी शाश्वत, दीर्घकालीन धोरणांची गरज : मंत्री भुसे

दोन-चार वर्षांनी कांद्याच्या दरात मोठी वाढ तर कधी घसरण होते. कधी ६ हजार तर कधी ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतात. कांद्याची मागणी असलेल्या देशांमध्ये सध्या निर्यात कमी होत आहे.

Team Agrowon

Onion Market Update नाशिक : दोन-चार वर्षांनी कांद्याच्या दरात (Onion Rate) मोठी वाढ तर कधी घसरण होते. कधी ६ हजार तर कधी ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतात. कांद्याची मागणी (Onion Demand) असलेल्या देशांमध्ये सध्या निर्यात (Onion Export) कमी होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची नेहमी होणारी दराची कोंडी सोडवण्यासाठी शाश्वत व दीर्घकालीन धोरणांची गरज असल्याचे मत पालकमंत्री दादा भुसे यांनी मांडले. बुधवारी (ता. २२) वाजगाव (ता. देवळा) येथील शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राच्या प्रारंभप्रसंगी भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बनकर होते.

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, द्वारकाधीश कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, नारायण सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंत आहिरे, ‘मविप्र’चे माजी संचालक डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, के. एन. आहिरे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार विजय सूर्यवंशी, कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, की पाकिस्तान, ऊस पिकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे कांद्याबाबत दीर्घकालीन नियोजन व धोरण आखण्यासाठी शासनपातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे.

वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी मदत देण्यासाठी तातडीने पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

केंद्राच्या संचालिका अंजना देवरे व पद्मा देवरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केवळ देवरे, बापूसाहेब देवरे, बाळासाहेब देवरे, शिवाजी देवरे, संजय देवरे, राजाराम देवरे, विजय देवरे यांनी संयोजन केले. मोठाभाऊ पगार यांनी सूत्रसंचालन केले.

एसटी भाड्यात ५० टक्के सूट नको, गॅस दरात द्या

राज्य सरकारने महिलांसाठी क्रांतिकारी निर्णय घेऊन एसटी भाड्यात ५० टक्के सवलत दिल्याचा संदर्भ भुसे यांनी भाषणात दिला. त्यावर महिलांची मागणी ५० टक्के एसटी भाड्याची नसून घरगुती गॅसच्या किमतीत ५० टक्के अनुदानाची असल्याचा चिमटा आमदार बनकर यांनी काढला. त्यावर प्रतिसाद देत यावरही निर्णय घेऊ, असे भुसे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT