Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

OBC Reservation: राष्ट्रवादीकडून २७ टक्के ओबीसी उमेदवार

Team Agrowon

मुंबई : राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नुकतेच राज्यातील ९२ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे पक्ष पातळीवर ओबीसी उमेदवार देण्यासंबंधीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी नियुक्त बांठिया आयोगाने (Banthia Commission) ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली असल्याचे राज्य सरकारच्या सूत्रांनी म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. यासंदर्भात उद्या (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालय याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून विरोधक आक्रमक झाल्यामुळे राज्य सरकार बॅकफुटवर गेल्याची चर्चा आहे. अतिवृष्टी आणि पावसाचे कारण सांगत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही निवडणूक पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणुक आयुक्तांशी चर्चा करू, असे सांगितले होते. आज भाजपचे प्रदेेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्य निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. राज्य सरकारशी सल्लामसलत न करता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT