Nashik Grapes Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Grapes Farmer : नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला तब्बल ६५ लाखांना गंडवल

Nashik Grapes Farmer : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याला तब्बल ६५ लाखांना गंडा घातल्याची घटना घडली.

sandeep Shirguppe

Nashik Farmer News : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याला तब्बल ६५ लाखांना गंडा घातल्याची घटना घडली. शेती खरेदी करून द्राक्षमालाची विकत घेत पैसे न देता व्यापाऱ्यांनी फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपत कारभारी ढबले (४५, रा. मातोरी शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते २०२२ दरम्यान, नौषाद मकसुद फारुकी, शमशाद दिलशाद फारुकी (दोघे रा. पखालरोड, नाशिक, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे.

संशयितांनी ढबले यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा विश्वासार्हता मिळवत. त्यांच्याकडून शिवार खरेदीप्रमाणे द्राक्षमाल खरेदी केला.

द्राक्षाचे पैसे धनादेशाद्वारे दिले. मात्र, बँकेत धनादेश न वटल्याने शेतकऱ्यांचे ६५ लाख ८ हजार ९६१ रुपयांचे नुकसान झाले. वारंवार मागणी करूनही फारुकी यांनी पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी नाशिक तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT