GM Mustard Agrowon
ताज्या बातम्या

GM Mohari : मोहरी ठरेल मानवी खाद्यातील पहिले जीएम पीक

भारतात २००२ साली कापसात जीएम तंत्रज्ञान आले. अनेक वर्षांच्या चाचण्या, चर्चा, वाद-विवादानंतर बीटी कापसाला भारतात परवानगी मिळाली.

टीम ॲग्रोवन

पुणेः भारतात २००२ साली कापसात जीएम तंत्रज्ञान (Cotton GM Technology) आले. अनेक वर्षांच्या चाचण्या, चर्चा, वाद-विवादानंतर बीटी कापसाला (BT Cotton) भारतात परवानगी मिळाली. बीटी कापूस वाणाचे (BT Cotton Verity) चांगले निष्कर्ष आले. देशात कापूस उत्पादकता (Cotton Productivity) वाढल्याने देश जगात आघाडीवर पोचला. त्यामुळे इतर पिकांमध्येही जीएम तंत्रज्ञान आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

भारताच्या सीजीएमसीपीने २००९ मध्ये बीटी वांग्याच्या उत्पादनाला परवानगी दिली होती. बीटी वांग्याला परवानगी देण्याआधी काही वर्षे देशात विविध ठिकाणी या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या. बीटी वांग्याचे हे वाण महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनीने मोन्सॅन्टोच्या परवानाच्या अख्यत्यारित विकसित केले होते.

मात्र शेतकऱ्यांना बीटी वांग्याच्या बियाण्याचे वितरण होऊ शकले नाही. कारण काही शेतकरी आणि संस्थांनी विरोध केल्यानंतर त्या वेळचे केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी बीटी वांग्याच्या बियाणे वितरणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती. मात्र शेजारच्या बांगलादेशमध्ये २०१३ पासून वांग्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू आहे.

देशात मानवी आहारातील पहिले जीएम पीक म्हणून मोहरीचा समावेश होऊ शकतो. कारण यापुर्वी देशात मानवी आहारात सामावेश होणाऱ्या कोणत्याच पिकामध्ये जीएम वाण नाहीत. केंद्रीय पर्यावरण, वने आणि पर्यावरण बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सेंटर फॉर जेनेटिक मॅनीप्यूलेशन ऑफ क्रॉप प्लांट, अर्थात सीजीएमसीपीने देशातील पहिल्या मानवी आहारातील जीएम पिकाच्या व्यावसायिक उत्पादनाचा मार्ग मोकळा केला. सीजीएमसीपीने मोहरीच्या जीएम वाणाच्या पर्यावरणीय प्रसारणाची शिफारस केली आहे.

सीजीएमसीपीने डीएमएच ११ या जीएम मोहरी वाणाचे लागवडीसाठी प्रसारण होण्यापूर्वी बियाणे उत्पादन व चाचण्यांच्या हेतूने पर्यावरणीय प्रसाराची शिफारस केली आहे. यापूर्वी २०१७ मध्येही यासारखीच परवानगी मिळाली होती. मात्र त्याला जोरदार विरोध झाल्यानंतर परवानगी मागे घेण्यात आली. मात्र आता जीएम मोहरी वाणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. जीएम मोहरीचे हे वाण सध्या अस्तित्वात असलेल्या वाणापेक्षा २८ टक्क्यांपर्यंत जास्त उत्पादकता देऊ शकते, असाही दावा करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकऱ्यांना वीज अनुदान, धानासाठी प्रति क्विंटल २,७०० रुपये हमीभाव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Flower Growers: पातूरच्या शेतकऱ्यांनी जोपासली फुलशेतीची परंपरा

Pokhara 2.0 Scheme: पोकरा 2.0 अंतर्गत हरितगृह, शेडनेटमधील भाजीपाला व फुलांना सहाय्य; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Rural Development: कल्पनाताईंनी समर्थपणे सांभाळली ‘ग्राम गौरव’ची धुरा

Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT