Vaidhnath Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मदतीला धावले पाथर्डीकर, परळी कारखान्याचा GST भरण्यासाठी लाखोंची मदत

Vaidhnath Sugar Factory : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखाना अडचणीत सापडला असून जीएसटी विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.

Swapnil Shinde

Beed News : परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याने १९ कोटी रुपयांचा कर चुकवला नाही. त्यामुळे जीएसटी विभागाने नोटीस बजावत जप्ती कारवाईचा इशारा दिला आहे. हा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अशात पंकजा मुंडे यांच्या मदतीला मुंडे समर्थक सरसावले असून पाथर्डी तालुक्यातील समर्थकांनी लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे.

१९ कोटी रुपयांचा कर चुकवल्याने जीएसटी आयुक्तालयाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचे नोटीस पाठवले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या मदतीसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडेही धावून आल्याची चर्चा आहे.

कारखान्यावरील कारवाईमुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या असून कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंडे समर्थक मदतीला धावून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील अनेक समर्थक सोशल मिडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीच्या रकमांची घोषणा करत आहेत.

मुंडे समर्थक सोशल मिडियावर विविध रकमांचे धनादेश 'गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान'च्या नावाने पोस्ट करत पाठिंबा देत आहेत. ही रक्कम पकंजा मुंडे यांच्याकडे दसरा मेळाव्यात सुपूर्त करण्यात येणार आहेत.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. या कारखान्याने अल्पावधीतच मराठवाड्यातील सर्वाधिक उसाचे गाळप करण्याचा विक्रम केला. तसेच राज्यभरातील अडचणीत सापडलेले वीस सहकारी साखर कारखाने चालवण्याची तयारी दाखवली होती. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखाना अडचणीत सापडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

SCROLL FOR NEXT