Ashadhi Wari 2023 Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : शासकीय महापूजा कालावधीत मुखदर्शन सुरू ठेवावे

Palkhi Sohala 2023 : आषाढी वारी कालावधीत भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबातचा आढावा पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतला.

Team Agrowon

Solpaur News : आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकरी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सुलभ व जलद व्हावे, यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा कालावधीत श्रींचे मुखदर्शन सुरू ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता. २३) दिल्या.

आषाढी वारी कालावधीत भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबातचा आढावा पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतला. भक्त निवास येथे झालेल्या बैठकीस खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, की आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा कालावधीत मुखदर्शन घेणारा भाविक वारकरी मुख दर्शन रांगेत खोळंबून राहतो. महापूजा कालावधीत मुखदर्शन सुरू राहिल्यास वारकरी भाविकांना त्याचा लाभ होईल. मुखदर्शन सुरू ठेवण्याबाबत आवश्यक उपाय योजना मंदिर समितीने करावी.

यासाठी मंदिर समितीने व्हीव्हीआयपी यांना बसण्याचे ठिकाण, मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार याबाबत आवश्यक ते नियोजन करावे. शासकीय महापूजा झाल्यानंतर व्हीआयपी दर्शन होणार नाही. मात्र पारंपारिक दिंड्यांचे प्रथा परंपरेप्रमाणे दर्शन सुरू राहील याची दक्षता मंदिर समितीने घेऊन आवश्यकती कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

महिलांसाठी आवश्यक सुविधा द्या

वारी कालावधीत महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. चंद्रभागा वाळवंट व आवश्यक ठिकाणी चेंजिंग रूम तयार कराव्यात. वारीत उभारण्यात आलेल्या शौचालयांमध्ये नियमित व पुरेसा पाणी साठा उपलब्ध करून द्यावा. शौचालयांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यापेक्षा अन्य काही उपाय योजना करण्याबाबत नगरपालिका व प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT