Crop Damage Compensation  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : अतीवृष्टीच्या मदतीबाबत संभ्रम दूर न केल्यास अंदोलन

Swabhimani Shetkari Sanghatana : गेल्या वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी मदत दिली जात आहे.

Team Agrowon

Nagar News : गेल्या वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी मदत दिली जात आहे. मदत मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीत मात्र अनेक शेतकऱ्यांची नावे नाहीत. ज्याची नावे आहेत, त्यांचे किती नुकसान झाले, मदत किती क्षेत्राला मिळतेय, नाव असूनही पैसे जमा होत नाहीत, असे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे संभ्रम तातडीने दूर करावेत, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्यासह बाळासाहेब जाधव, सचिन गडगुळे, किशोर बोरुडे, गणेश सोळुंके, अप्पासाहेब सोळंके, कैलास काकडे, गणेश बोरुडे, अनिल बोरसे, राकेश खरात, बाळासाहेब खाडे, शिवाजी खाडे, विलास चौधरी, भास्कर जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.

त्यापोटी मदत देण्याचे काम सुरू आहे. मात्र मदत देण्याबाबत जी यादी प्रसिद्ध केली आहे, त्याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्या यादीत नुकसान झालेल्या अनेक लाभार्थ्यांची नावे नाहीत. आपले नुकसान झाले, मात्र पंचनामा झाला की नाही, आपल्याला मदत मिळणार आहे की नाही? मिळणार असेल तर ती कधी मिळणार यासह अनेक बाबीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यामुळे प्रशासनाने ज्यांचे नुकसान झाले, पंचनामे झाले आहेत, त्यांची यादी प्रसिद्ध करावी तसेच शेतकऱ्यांत निर्माण होणारे संभ्रम दूर करावेत, अशी मागणी केली आहे. शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशाराही यापूर्वीच देण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT