Mother Dairy  Agrowon
ताज्या बातम्या

Mother Dairy : मदर डेअरीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ

वर्षभरात पाचव्यांदा दरवाढ, कच्च्या दुधाच्या २४ टक्क्यांनी वाढल्याचा दावा

Team Agrowon

नवी दिल्ली (एएनआय) : मदर डेअरीने (Mother Dairy ) दुधाच्या किमतीत (Milk Rate) दोन रुपयांची वाढ केली आहे. प्रतिलिटर ६४ रुपये वरून ६६ रुपये असे दर केले आहे. मंगळवार (ता.२७) पासून ही दरवाढ दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्ये लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, गाईच्या दुधाच्या किरकोळ किमतीत आणि टोकन दुधाच्या प्रकारांमध्ये कोणतीही सुधारणा होणार नाही. २०२२ मधील अत्यावश्यक खाद्यपदार्थ, दुधाच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. या आधीची सुधारणा मार्च, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती.

‘‘दुग्ध उद्योगासाठी हे अभूतपूर्व वर्ष आहे. सणानंतरही ग्राहक आणि संस्थांकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे. दुसरीकडे, कच्च्या दुधाच्या खरेदीनंतरही वाढ झालेली नाही. जास्त उत्पादन खर्च, वाढती उष्णता आदींमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या दुधाच्या खरेदीच्या किमती २४ टक्क्यांनी वाढल्या आहेत,’’ असे मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले.

`शेतकऱ्यांना किफायतशीर दर देण्यासाठी वचनबद्ध`
‘‘कच्च्या दुधाच्या किमतींवरील हा ताण संपूर्ण उद्योगात जाणवत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदी दरावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना किफायतशीर दर देणे सुरू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यानुसार नाइलाजाने आम्ही दिल्लीत दुधाच्या निवडक प्रकारांत दर वाढवीत आहोत. एक जबाबदार संस्था म्हणून, आम्ही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात योग्य संतुलन साधण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Crop Loss: राज्यात ५ लाख ४९ हजार हेक्टरवरील शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका; शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट

Nanded Rain : नांदेडमध्ये मुसळधार पाऊस; विष्णुपुरी धरणाचे ८ दरवाजे उघडले

Parbhani Rainfall : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा कहर

Satara Rain : दमदार पावसामुळे साताऱ्यातील पाच धरणांतून विसर्ग सुरू

Latur Rain : कर्नाटक सीमावर्ती भागांत पावसाने नुकसान

SCROLL FOR NEXT