Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पावसाचा २१ दिवसांपेक्षा अधिक खंड

Sangli Rain Update : जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली होती. परंतु जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला. परंतु त्यानंतर पावसाने उघडी दिली आहे. जिल्ह्यात ६८ महसूल मंडल आहेत, त्यापैकी ३६ मंडलांत २१ आणि २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडल आहे. त्यामुळे पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण कधी होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली होती. परंतु जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जुलै महिन्यातही अनेक भागांत हलका आणि मध्यम पाऊस झाला. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने उघडिप दिली.

कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्ह यामुळे पिके वाळू लागली आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात २४.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वास्तविक पाहता ज्या दिवशी अडीच मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर त्याला प्रजन्य दिन संबोधतात. परंतु २८ जुलै ते ऑगस्ट महिना संपत आलां तरी पावसाने पूर्णतः उघडिप दिली आहे.

जिल्ह्यात ६८ महसूल मंडले आहेत. त्यापैकी ३६ मंडलांत २१ व २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी, कडेगाव तालुक्यांतील नेवरी, मिरज तालुक्यांतील मिरज, जत तालुक्यांतील जत, कुंभारी या पाच मंडलांत ३१ दिवस तर खानापूर तालुक्यातील खानापूर मंडलात ३२ दिवस पावसाने दडी मारली आहे. त्यातच अजून १० मंडलांत १९ दिवस पावसाचा खंड पडला आहे. आता ही मंडले त्यामध्ये वाढणार आहेत.

तालुकानिहाय पावसाचा

खंड असलेली मंडले

तालुका मंडल संख्या

मिरज ४

जत ६

खानापूर २

वाळवा ८

तासगाव ४

आटपाडी २

कवठेमहांकाळ ४

पलूस २

कडेगाव ४

एकूण ३६

जिल्ह्यातील ३६ मंडलांत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड झाला आहे. पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या पिकाचे सर्वेक्षण करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.
- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT